शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सुखद ! दोन हजार कोटींतून औरंगाबादेत होणार सीएनजी गॅस पाईपलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 13:38 IST

वाळूज औद्योगिक वसाहत, शेंद्रा - बिडकीन डी एमआयसीतील उद्योजकांसह शहरातील कुटुंबांना घरगुती गॅस उपलब्ध होणे शक्य होईल.

ठळक मुद्देभारत गॅस रिसोर्सेस कंपनीला १७५ कि.मी.चे कंत्राटऔरंगाबादपर्यंतचे काम पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी

औरंगाबाद : अहमदनगर ते वाळूजमार्गे औरंगाबाद शहरापर्यंत दोन हजार कोटींतून सीएनजी वाहिनी टाकण्यात येणार आहे. भारत पेट्रोलियम नैसर्गिक वायू रिसोर्स कंपनीला वायू वाहिनी टाकण्याचे कंत्राट मिळाले आहे. १७५ कि.मी. अंतरावरून २४ इंची स्टील पाईपद्वारे औरंगाबादेत गॅस उपलब्ध होणार आहे. याबरोबर सीएनजी १०६ इंधन पंप्सदेखील सुरू होण्याचा मार्ग आगामी काळात मोकळा होणार आहे, तर सात लाखांच्या आसपास घरगुती गॅस जोडण्या यातून देणे शक्य होईल, असा दावा केला जात आहे.

वाळूज औद्योगिक वसाहत, शेंद्रा - बिडकीन डी एमआयसीतील उद्योजकांसह शहरातील कुटुंबांना घरगुती गॅस उपलब्ध होणे शक्य होईल. या कामासाठी दोन हजार कोटींचा खर्च येणार आहे. औरंगाबादपर्यंत पाईपलाईनचे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. २०१८ मध्ये याबाबत प्रक्रिया सुरू झाली होती. भौगोलिक पाहणीअंती याबाबत निर्णय झाला आहे. ऑगस्ट २०२० मध्ये कंत्राटदार कंपनी भारत गॅस रिसोर्सेस प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीपाद मांडके यांनी येथे बैठक घेतली होती. बैठकीला इंडियन ऑईल कंपनी, बीपीसीएल, हिंदुस्तान ऑईल कंपनी प्रतिनिधी उपस्थित होते.

नैसर्गिक गॅस हा लिक्विफाईड गॅसपेक्षा स्वस्त व सुरक्षित आहे. या गॅसची किंमत इतर गॅस कंपन्यांपेक्षा पंधरा ते वीस टक्क्यांनी कमी आहे. या प्रकल्पांतर्गत शहरात १२५ ते २० मि.मी. व्यास जाडीच्या पाईपलाईन टाकणे, त्यासाठी घरापर्यंत गॅस पुरवठा करून मीटर रीडिंगनुसार बिल आकारण्याचे नियोजन आहे.

मार्च महिन्याअखेर भूमिपूजनाची शक्यतापाईपलाईन टाकण्याच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असून, मार्च महिनाअखेर या कामाचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे. विविध खात्यांचे परवाने मिळविण्यासाठी पत्रव्यवहार सुरू करण्यात आला आहे. यासाठी डी. पी. असोसिएट कन्सल्टंट ही संस्था काम पाहत आहे. औरंगाबाद मनपा, सार्वजनिक बांधकाम, सिडको, रस्ते विकास व औद्योगिक महामंडळ यासह इतर विभागांचे परवाने या पाईपलाईनच्या कामासाठी मिळण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद