शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

पैठणच्या तीर्थस्तंभाला मिळणार झळाळी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:32 IST

पैठणचे प्राचीन वैभव म्हणून ओळख असलेल्या येथील प्राचीन तीर्थस्तंभाचे जतन व संवर्धन करण्यासाठी पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणातून ८० लाख रुपयांची तरतूद जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केल्यामुळे झिजत चाललेल्या या प्राचीन दगडी शिल्पाला नवी झळाळी मिळणार आहे. या निर्णयामुळे इतिहासप्रेमींना दिलासा मिळाला असून, या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

अंकुश वाघ ।लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : पैठणचे प्राचीन वैभव म्हणून ओळख असलेल्या येथील प्राचीन तीर्थस्तंभाचे जतन व संवर्धन करण्यासाठी पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणातून ८० लाख रुपयांची तरतूद जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केल्यामुळे झिजत चाललेल्या या प्राचीन दगडी शिल्पाला नवी झळाळी मिळणार आहे. या निर्णयामुळे इतिहासप्रेमींना दिलासा मिळाला असून, या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.या प्राचीन तीर्थस्तंभाकडे पुरातत्व विभागाने गेल्या ५० वर्षांत गांभीर्याने लक्ष न दिल्याने या ऐतिहासिक वास्तूचे अस्तित्व धोक्यात आले आहे. यावर वेळोवेळी इतिहासप्रेमी नागरिकांनी पालिकेकडे केलेल्या मागणीमुळे या तीर्थस्तंभाला आधार मिळाला. पुरातत्व विभागाकडून लक्ष दिले गेले नसून राष्ट्रीय संपत्ती म्हणून फलक लावण्यापुरतेच काम केल्याचे इतिहासप्रेमींचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे प्राधिकरणातही स्थापनेपासून यासाठी ५० लाखांचा निधी राखीव होता; परंतु प्राधिकरण समितीनेही याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे निधी असूनही इतके दिवस नियोजनाअभावी काम रखडलेहोते.या तीर्थस्तंभात एकंदर चार भिन्न विभाग असून, प्रत्येक विभाग परस्परात सुव्यवस्थित बसविला आहे. तळाला सभा मंडप, सुरदार खांब आहेत. त्यामध्ये कोरलेले गाभारे व गाभाऱ्यातच मूर्ती बसविल्या असून, स्तंभ गोलाकार असला तरी सर्व शिल्पे चौकोनी आकारात आहेत. नऊ देवतांच्या एका मंडळापासून स्तंभास सुरुवात होते. मंडळातील नऊ प्रमुख देवतांमध्ये नृत्यरत गणेश, महेश आहेत. भैरवाच्या गळ्यातील रुद्रमाळा व रुद्र माळातून रक्त चाटणारा श्वान कलात्मक पद्धतीने दाखविण्यात आला आहे. मंडळानंतर मकर मुखपट्टीचा गोलाकार आहे, तसेच संस्कृतीच्या विविधतेची शिल्पे या स्तंभात साकारण्यात आली असल्यामुळे पैठणचे हे प्राचीन वैभव मानले जाते.पैठणच्या प्राचीन संस्कृतीच्या इतिहासाची साक्ष देणारा हा तीर्थस्तंभ असून, पालिकेने आतापर्यंत देखभाल व दुरुस्ती केली आहे. प्राधिकरणातून यासाठी ५० ऐवजी ८० लाख रुपयांच्या निधीला जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मान्यता दिली आहे. आर्किटेक्टने पाहणी केली असून, लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची पैठणकरांची ही मागणी पूर्ण होत आहे, असे नगराध्यक्ष तथा प्राधिकरण विकास समितीचे उपाध्यक्ष सूरज लोळगे यांनी सांगितले.

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणhistoryइतिहास