शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

झाडाखाली पडलेला आंबा उचलला म्हणून पर्यटकाला बेदम मारहाण; बीबी-का-मकबऱ्यातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 13:25 IST

आरोपींनी पर्यटकाचा पाठलाग करत बाहेर पकडून पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

छत्रपती संभाजीनगर : बीबी-का-मकबरा पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकाने आंब्याच्या झाडाखाली पडलेला आंबा उचलला म्हणून तेथील आंब्यांचे टेंडर घेतलेल्या टेंडरधारक व त्याच्या अन्य तीन साथीदारांनी त्याला बेदम मारहाण केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना ७ जून रोजी दुपारी तीन वाजता घडली. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूळ सोलापूरचे रहिवासी असलेले कलीम गौसउद्दीन शेख (वय ४२) हे ७ जून रोजी पत्नी व भावासोबत मकबरा पाहण्यासाठी गेले होते. दुपारी मकबरा पाहत असताना तेथील उद्यानात ते गेले. उद्यानातील एका आंब्याच्या झाडाखाली पडलेला आंबा दिसताच कलीम यांना तो उचलण्याचा मोह झाला. त्यांनी ताे उचलताच आंब्याचे टेंडर घेतलेल्या शेख छोटू शेख रहेमान (५०) याने साथीदार शेख तौफिक शेख छोटू (२४, दोघेही रा. जयसिंगपुरा), फैसल बाबू शेख व अन्य एकाने त्यांना थेट मारहाण सुरू केली.

एकाने बांबूच्या काठीने त्यांच्यावर प्रहार केले. कलीम यांनी स्वत:ची सुटका करत ते प्रवेशद्वाराजवळ गेले. आरोपींनी त्यांचा पाठलाग करत बाहेर पकडून पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात कलीम गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात उपचार घेऊन बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBibi-ka-Maqbaraबीबी का मकबराAurangabadऔरंगाबाद