शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यातील ६६ डॉक्टरांचे रोखले भत्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:26 IST

आरोग्य केंद्रांमध्ये चोवीस तास रुग्णसेवा देणे बंधनकारक असतानादेखील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी थांबत नाहीत. यासंबंधी प्राप्त तक्रारीनुसार चौकशी केली असता जिल्ह्यातील ११२ पैकी ६६ वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्धच्या तक्रारींमध्ये तथ्य आढळले.

ठळक मुद्देनिमित्त : पीरबावडा प्रकरणामुळे जि. प. आरोग्य विभाग सतर्क

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आरोग्य केंद्रांमध्ये चोवीस तास रुग्णसेवा देणे बंधनकारक असतानादेखील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी थांबत नाहीत. यासंबंधी प्राप्त तक्रारीनुसार चौकशी केली असता जिल्ह्यातील ११२ पैकी ६६ वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्धच्या तक्रारींमध्ये तथ्य आढळले. त्यामुळे त्यांचा घरभाडे भत्ता रोखण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी दिली.पीरबावडा उपकेंद्रामध्ये २२ मार्च रोजी एक महिला प्रसूतीसाठी गेली. तेव्हा तेथे कार्यरत तीन आरोग्य सहायिका व दोन आरोग्य सेवक उपस्थित नव्हते. त्या महिलेला वेळेवर आरोग्य सेवा न मिळाल्यामुळे ती बाहेरच प्रसूत झाली.हे प्रकरण मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खतगावकर यांनी गांभीर्याने घेतले. या प्रकरणात एक जण निलंबित, तर उर्वरित ६ जणांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने तालुका आरोग्य अधिकारी हे त्या- त्या तालुक्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांचे संनियंत्रण अधिकारी असतात. कोणते कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी गैरहजर आहेत, याबाबतचा अहवाल त्यांनी ‘डीएचओ’ कार्यालयास सादर करायला पाहिजे.यापुढे जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांना १ एप्रिलपासून बायोमेट्रिक मशीनद्वारे हजेरी नोंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे. जेथे नादुरुस्त बायोमेट्रिक मशीन असतील, त्या दुरुस्त करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.बायोमेट्रिक मशीनच्या हजेरीची जे अधिकारी, कर्मचारी अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांना एप्रिल महिन्याचे वेतन देऊ नये, अशा स्पष्ट सूचना आरोग्य संचालनालयाने दिल्या आहेत. गैरहजर डॉक्टरांबाबत ‘ड्यूटी पे’ हा निर्णय घेण्यात आला आहे. बाजारसावंगी आणि लोणी येथे आठवड्यातून केवळ तीनच दिवस सेवा बजावणाºया वैद्यकीय अधिकाºयांचे केवळ १२ दिवसांचे वेतन काढण्यात आले आहे.डॉक्टरांविरुद्ध कडक कारवाईजिल्ह्यात ५० प्राथमिक आरोग्य केंद्रे व २७९ उपकेंद्रे असून, त्यामध्ये ११२ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणाºया ११ वैद्यकीय अधिकाºयांचा ‘एनपीए’ बंद करण्यात आला आहे.दूरध्वनीच्या १०४ क्रमांकावर प्राप्त तक्रारींची खातरजमा केल्यानंतर १२ वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात आले आहे.मुख्यालयी न राहणाºया ६६ वैद्यकीय अधिकाºयांचा घरभाडे भत्ता बंद करण्यात आला आहे. तीन वैद्यकीय अधिकाºयांच्या वेतनवाढी रोखल्या आहेत. ९ वैद्यकीय अधिकाºयांची विभागीय चौकशी सुरू आहे.तक्रारीवरून ३ वैद्यकीय अधिकाºयांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्याचा प्रस्ताव आरोग्य संचालनालयाकडे सादर करण्यात आला आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी सांगितले.

टॅग्स :doctorडॉक्टरAurangabadऔरंगाबादzpजिल्हा परिषद