शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मौजमजेसाठी घेतलेल्या कर्जफेडीसाठी पेट्रोल चोरी; पोलिसांनी दोघांना रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 16:06 IST

गारखेडा परिसरातील रिलायन्स मॉल मागील छत्रपती नगरातून दोघांना ताब्यात घेतले

ठळक मुद्देमौजमजा करण्यासाठी मित्रांकडून उसने पैसे घेतले आहेत.पैशाची परतफेड करण्यासाठी पेट्रोल चोरी करुन ते विक्री करीत पेट्रोल चोरी करताना पोलिसांनी दोघांना रंगेहाथ पकडले

औरंगाबाद: गारखेडा परिसरातील छत्रपती नगर येथे दुचाकी मधून पेट्रोल चोरी करताना दोन चोरट्यांना गस्तीवरील पुंडलिक नगर पोलिसांनी गुरुवारी रात्री ३:१५ वाजेच्या सुमारास रंगेहात पकडले. याप्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

किरण रामभाऊ दापके (रा.कडा परिसर ) आणि कृष्णा अण्णासाहेब लष्करे (रा. शिवाजीनगर) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. गेल्या काही दिवसापासून पेट्रोलचे दर सतत वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पेट्रोल खरेदी करताना सतत झळ बसत आहे. अशातच चोरट्यांनी पेट्रोल चोरीचा नवीन धंदा केला. गारखेडा परिसरातील रिलायन्स मॉल मागील छत्रपती नगरातून गस्तीवरील पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, हवालदार इमरान आतार आणि होमगार्ड शेख हे २४ रोजी रात्री ३:१५ वाजेच्या सुमारास जात होते. तेव्हा तेव्हा तेथे दोन जण अंधारात उभे असल्याचे पोलिसांना दिसले. 

पोलिसांनी त्यांचे वाहन थांबताच आरोपी पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करून अवघ्या काही अंतरावर दोन्ही संशयिताना पकडले. तेव्हा तेथील एका मोटारसायकलच्या इंधन टाकितील पेट्रोल ते चोरत असल्याचे दिसून आले. त्यांच्याजवळील प्लास्टिक कॅनमध्ये त्यांनी विविध वाहनातून चोरलेले दहा ते बारा लिटर पेट्रोल होते. याप्रकरणी पोलीस कॉंस्टेबल इमरान यांनी सरकारतर्फे पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरूध्द गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. पोलीस हवालदार एल बी हिंगे हे तपास करीत आहेत. आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल चोरी करीत असावेत असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

कर्ज फेडण्यासाठी पेट्रोल चोरीदोन्ही आरोपी ९ वी आणि १२ वीपर्यंत शिकलेले आहेत. ते अधूनमधून मजूरी करतात. मात्र मौजमजा करण्यासाठी त्यांनी मित्रांकडून उसने पैसे घेतले आहेत. उसने पैशाची परतफेड करण्यासाठी पेट्रोल चोरी करुन ते विक्री करीत असल्याची कबुली त्यांनी दिली.

टॅग्स :Petrolपेट्रोलAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी