शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
2
ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर...
3
Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांच्या नोकराकडेच होते २८४ कोटी; 'मॅडम'कडील प्रॉपर्टीचा आकडा वाचून तर बघा...
4
'या' एका चुकीमुळे लीक होऊ शकते तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे प्रायव्हेट चॅट; तुम्हाला माहीत आहे का?
5
'ऑपरेशन सिंदूर' हा फक्त ट्रेलर होता', लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला उघड इशारा, दिल्ली स्फोटानंतर लष्कर सज्ज
6
मोबाईलवर मिनिटांत तपासा तुमचा NPS बॅलन्स; पाहा NSDL, उमंग ॲप आणि मिस्ड कॉलची सोपी पद्धत
7
फलटणमध्ये महायुतीतच 'खेळ'! शिंदेंच्या शिवसेनेकडून रामराजेंचा मुलगा, भाजपाकडून माजी खासदारांचा भाऊ मैदानात
8
कमाल! नोकरीसोबतच घरची जबाबदारी, ६ वेळा नापास; २ मुलींची आई ४० व्या वर्षी झाली IAS
9
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? 
10
Delhi Blast: दिल्लीत स्फोट घडवण्यासाठी किती पैसे दिले गेले होते, डॉ. शाहीनची काय होती भूमिका?
11
बँकिंग शेअर्समध्ये ऐतिहासिक तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जोरदार वाढ; 'ही' आहेत प्रमुख ४ कारणं
12
किरकोळ गुंतवणूकदारांनी 'या' १० शेअर्समध्ये टाकले ₹१८,००० कोटी! सुजलॉन त्यापैकी एक, आणखी नावं कोणती?
13
DIY Tips: ड्राय क्लीनिंगचा खर्च वाचवा! कपड्यांवरील चिवट डाग काढण्यासाठी 'हा' घरगुती फॉर्म्युला वापरा 
14
"राहुल गांधी पंतप्रधान होवोत अथवा न होवोत, आमचा हेतू...!" बिहार निवडणुकीसंदर्भात बोलताना काय म्हणाले रॉबर्ट वाड्रा? 
15
क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! बिटकॉइन १५ लाख तर इथर १.३५ लाखानं कोसळला; ही आहेत कारणं
16
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
17
MLA Disqualification Case: 'आमदारांचं प्रकरण दोन आठवड्यात निकाली काढा, नाहीतर...'; सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांवर संतापले
18
Gold & Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; Gold २ हजारांपेक्षा अधिकनं झालं स्वस्त, Silver मध्ये ६५०० ची घसरण
19
दिल्ली स्फोट तपास: कोडवर्ड, 'वुल्फ आवर' आणि महिला दहशतवाद्यांचे 'ऑरोरा-लूना' पथक!
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला; तरी आम्हाला काहीच कसे वाटत नाही ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 12:34 IST

Petrol-diesel prices hike पूर्वी पेट्रोल-डिझेल असो वा गॅस किंवा जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ झाली की, लोक आंदोलन करत. रस्ता जाम करून टाकत. या आंदोलनाचा आवाज मुंबईच नव्हे तर दिल्लीपर्यंत जात असे.

ठळक मुद्दे लोकांना आता महागाईची सवय लागली की उत्पन्न वाढले ?पूर्वी व्हायची आंदोलने; आता सर्वच गप्प होण्याचे रहस्य काय?

औरंगाबाद : पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीने उच्चांक गाठला आहे. या भाववाढीचा परिणाम हळूहळू जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होत आहे. मात्र, एवढी महागाई होऊनही कोणतीच संघटना, राजकीय पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास पुढे येत नाही, याचे काय रहस्य असावे?

पूर्वी पेट्रोल-डिझेल असो वा गॅस किंवा जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ झाली की, लोक आंदोलन करत. रस्ता जाम करून टाकत. या आंदोलनाचा आवाज मुंबईच नव्हे तर दिल्लीपर्यंत जात असे. कांद्यातील भाववाढीने तर, भाजपचेच केंद्रातील सरकार पडले होते. मात्र, आता महागाईने कळस गाठला आहे. पेट्रोल ९३ रुपये तर डिझेल ८३ रुपये लिटरपर्यंत जाऊन भिडले आहे. मागील चार वर्षांत लिटरमागे पेट्रोल १९ रुपयांनी तर डिझेल १७ रुपयांनी महागले आहे. पण विरोधी पक्ष असो की अन्य संघटना असो, एवढेच काय मध्यमवर्गीयही मूग गिळून बसले आहेत. कोणी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास तयार नाही. फक्त सोशल मीडियावर टिवटिव सुरू आहे.

लोकांना आता महागाईची सवय लागली की उत्पन्न वाढले, किंवा कितीही आंदोलने केली तरी सरकारवर काहीच परिणाम होत नाही म्हणून विरोधी पक्ष, संघटना यांच्यात नैराश्य आले आहे, असे एक ना अनेक प्रश्न पडत आहेत. केंद्र सरकार असो वा राज्य सरकार अन्य प्रश्न, आंदोलनाने, विविध निवडणुका यात एवढा गुरफटला आहे की, त्यांना वाढत्या महागाईकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही, असाही प्रश्न पडत आहे. आंदोलनाला जनतेची साथ आता मिळत नाही, आंदोलन केले तरीही दखल सरकार घेत नाही, आंदोलन करणाऱ्यांंना सरकार विविध गुन्ह्यात अडकविते, अशा भय व संभ्रमावस्थेत आता संघटना अडकल्या आहेत, असे संघटनेचे पदाधिकारी खासगीत कबूल करत आहेत.

रमलेल्या सत्ताधाऱ्यांना जागे करणारपेट्रोल-डिझेलचे भाव वाढले की, त्यात केंद्र व राज्य सरकारला टॅक्स रूपात फायदा होतो. मात्र, या महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे. सत्तेत रमलेल्या सत्ताधाऱ्यांना जागे करण्यासाठी मनसे लवकरच आंदोलन करणार आहे, तसे नियोजन सुरू आहे.- सुहास दशरथे, जिल्हाध्यक्ष, मनसे

आंदोलनाची दखल घेतली जात नाहीपूर्वी आंदोलन झाले की, सरकार दखल घेत असे. पण, आताचे केंद्रातील सरकार असो वा राज्यातील असंवेदनशील झाले आहे. शेतकरी व कामगारांच्या लांबलेल्या आंदोलनावरून असे दिसून येत आहे. सरकारने एवढे प्रश्न निर्माण केले की, संघटना किती विषयांवर आंदोलने करणार?- सुभाष लोमटे, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य हमाल-मापाडी महामंडळ

आंदोलन केले तर लोक आम्हालाच नावे ठेवतात२०१४ आधी मध्यमवर्गीय लोक आंदोलनात सहभागी होत असत. विशेषतः पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढीसंदर्भात. मात्र, आता मध्यमवर्गीयांची मानसिकता बदलली आहे. इंधनात एवढी भाववाढ होऊनही जनता गप्प बसली आहे. कारण, मध्यमवर्गीय हिंदूंनीही सरकार निवडून दिले आहे. आम्ही आंदोलने केली तर आम्हाला देशद्रोही ठरविले जाते. सतत आंदोलन करतात म्हणून नावे ठेवली जातात.- अभय टाकसाळ, जिल्हा सहसचिव भाकप

महागाई वाढली; पण आवाज कोण उठवणार?पूर्वी देशात विरोधी पक्ष असे व महागाईविरोधात आवाज उठवला जात असे. पण, आता देशात विरोधी पक्ष राहिला नाही. सर्वांनी आघाडी केली आहे. मग सर्वसामान्यांचा आवाज कोण ऐकणार.- संध्या देशपांडे, गृहिणी

अन्य समस्यांसमोर महागाई गौणसर्वसामान्यांना दैनंदिन जीवनात एवढ्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे की, ते त्यात गुरफटून गेले आहेत. त्यामुळे आता महागाईचा प्रश्न गौण वाटत असावा, म्हणून महागाईविरोधात आंदोलने होत नाहीत.- अनुराधा खिस्ती, गृहिणी

मालवाहतूक भाडे वाढलेपेट्रोल- डिझेलचे दर वाढल्याने मालवाहतूकदारांनी गाडी भाडे १० ते १५ टक्क्याने वाढविले आहे. त्यामुळे धान्य, डाळी, तांदळाचे भाव क्विंटलमागे १५ ते २० रुपयांनी वाढले आहेत. डिझेलच्या भावात आणखीन वाढ झाली तर महागाई जास्त वाढेल. शेतकरी आता तूर, शिल्लक मका बाजारात आणत आहेत. लोडिंग रिक्षा, ट्रॅक्टर, टेम्पोवाल्यांनी गाडीभाडे वाढविले आहे.

पेट्रोल- डिझेलचे भाव महिना वर्ष -पेट्रोल -डिझेल (प्रति लिटर)१८ जानेवारी २०१७ - ७६.७९ रू - ६४.२१ रू१८ जानेवारी २०१८ - ८०.३६ रू - ७५.८८ रू१८ जानेवारी २०१९ - ७७.३३ रू -  ६७.६९ रू१८ जानेवारी २०२० - ८१.९४ रू - ७३.०४ रू१८ जानेवारी २०२१ - ९२.७७ रू - ८३.०८ रू

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलAurangabadऔरंगाबाद