शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका प्रभाग रचनेवरील याचिकांची सुनावणी पूर्ण; निकाल राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 12:41 IST

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने शहरातील ११५ वॉर्डांची रचना आणि आरक्षणाची माहिती महापालिकेला दिली होती.

ठळक मुद्देनवीन वॉर्ड रचनेत जुने वॉर्ड तोडून इतर वॉर्डांना जोडले आहेत. दलित वस्त्यांचे विभाजन करणे हे निवडणूक आयोगाच्या निर्देशाविरुद्ध आहे.

औरंगाबाद : महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वॉर्ड रचनांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एस. डी. कुलकर्णी यांच्या खंडपीठात एकत्रितपणे झालेली सुनावणी शुक्रवारी (दि.१३) पूर्ण झाली. खंडपीठाने या याचिकांवरील निकाल राखून ठेवला आहे.

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने शहरातील ११५ वॉर्डांची रचना आणि आरक्षणाची माहिती महापालिकेला दिली होती. महापालिकेने ती जाहीर केली. नवीन वॉर्ड रचनेसंदर्भात आजी-माजी नगरसेवक आणि नागरिकांनी सुमारे ३७० आक्षेप नोंदविले होते. त्यावर सुनावणी घेऊन काही आक्षेप फेटाळण्यात आले होते. 

या निर्णयास माजी नगरसेवक समीर राजूरकर आणि किशोर तुळसीबागवाले, अनिल विधाते, लक्ष्मीनारायण बाकरिया, महंमद अय्युब खान महंमद हुसेन खान, राजेंद्र नरवडे, मुसा पटेल नूर महंमद पटेल, बाळासाहेब सानप, हकीम कडू पटेल, रियाज खान आजम खान, राहुल इंगळे आणि झकात फौंडेशन यांनी खंडपीठात आव्हान दिले होते.

नवीन वॉर्ड रचनेत जुने वॉर्ड तोडून इतर वॉर्डांना जोडले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या २४ आॅक्टोबर २००५ आणि २ जुलै २०१३ च्या निर्देशांचे महापालिकेने पालन केले नाही. गुप्ततेचा भंग केला. प्रत्येक वॉर्डात कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती मतदार असावेत, हे निवडणूक आयोगाने ठरवून दिले आहे. त्याचा भंग झाला आहे. दलित वस्त्यांचे विभाजन करणे हे निवडणूक आयोगाच्या निर्देशाविरुद्ध आहे. शिवाय लोकसंख्येच्या ‘प्रगणका’ नुसार वॉर्ड तोडू नयेत, असे संकेत आहेत, त्याचा भंग झाला आहे. नवीन वॉर्ड रचना रद्द करून जुन्या वॉर्ड रचनेनुसारच निवडणूक घ्यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती. यावर महापालिकेतर्फे अ‍ॅड. संजीव देशपांडे आणि राज्य निवडणूक आयोगातर्फे अ‍ॅड. अजित कडेठाणकर यांनी निवेदन केले.  

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ