शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दगडाने ठेचून खून झालेली व्यक्ती सुरेवाडीतील; ओळख पटविण्यात पोलिसांना आले यश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 19:05 IST

Crime News in Aurangabad : जाधववाडी येथील व्यापारी संकुलाच्या छतावर दादाराव यांची अज्ञात मारेकऱ्यांनी सिमेंट गट्टूने डोके ठेचून त्यांचा खून केल्याचे शुक्रवारी (दि. २१) रोजी सकाळी उघडकीस आले होते.

ठळक मुद्देजाधववाडीत दगडाने ठेचून खून झालेली व्यक्ती सुरेवाडीतील रहिवासी

औरंगाबाद : नवा मोंढा, जाधववाडी येथील जनरल व्यापारी संकुलाच्या छतावर दगडाने ठेचून खून झालेल्या अनोळखी व्यक्तीची ओळख पटविण्यात पोलिसांना शनिवारी सकाळी यश आले. दादाराव सांडू सोनवणे (४५, रा. सुरेवाडी) असे मयताचे नाव आहे. मयत सोनवणे हे गेले काही दिवस कोणासोबत राहत होते. घटनेच्या रात्री त्यांचे कुणासोबत भांडण झाले होते का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. सिडको पोलिसांनी सांगितले की, जाधववाडी येथील व्यापारी संकुलाच्या छतावर दादाराव यांची अज्ञात मारेकऱ्यांनी सिमेंट गट्टूने डोके ठेचून त्यांचा खून केल्याचे शुक्रवारी (दि. २१) रोजी सकाळी उघडकीस आले होते. याप्रकरणी सरकारतर्फे सिडको ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध फौजदार बुधा शिंदे यांनी खुनाचा गुन्हा नोंदविला होता. पोलीस निरीक्षक अशोक गिरी आणि कर्मचाऱ्यांनी मयताची ओळख पटविण्यासाठी त्यांच्या चेहऱ्याचे छायाचित्र काढले आणि समाजमाध्यमावर प्रसारित केले होते. मयत यांच्या उजव्या हातावर डीएसएस असे इंग्रजीत आणि ॐ असे अक्षर गोंदलेले असल्याचे सांगितले होते. 

या वर्णनासह लोकमतने शनिवारी बातमी प्रकाशित केली. तेव्हा त्यांच्या साडभाऊ आणि मुलाने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी त्यांना प्रेताचे छायाचित्र आणि प्रत्यक्ष दाखविले तेव्हा त्यांनी हंबरडा फोडून ते दादाराव सोनवणे असल्याचे सांगितले. मयताचे शवविछेदन झाले होते. यामुळे शनिवारी सकाळी पोलिसांनी नातेवाइकांच्या ताब्यात मृतदेह दिला. सोनवणे हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते. दारूचे व्यसन असल्यामुळे ते सतत नातेवाइकांशी भांडण करीत आणि निघून जात. तीन ते चार दिवस घरी परतत नव्हते. सहा ते सात दिवसांपूर्वी घरी भांडण करून सोनवणे हे घराबाहेर पडले होते. ते परत येतील म्हणून नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला नव्हता. त्यांचा खून झाल्याचे समजल्याने नातेवाइकांना धक्काच बसला. त्यांच्या पश्चात पत्नी, २२ वर्षीय मुलगा आणि १२ वीमध्ये शिकत असलेली मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी