शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

परवानगी फक्त १७ झाडांची, प्रत्यक्षात तोंडली ४०० सागवान झाडे; कंपनीला २१ लाखांची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 19:51 IST

डिस्टीलरी कंपनीने अद्याप दंड भरला नसल्याची माहिती

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील एका डिस्टीलरी कंपनीने मनपाच्या उद्यान विभागाकडून सागवानाची १७ झाडे तोडण्याची परवानगी घेतली. प्रत्यक्षात कंपनीने तब्बल ४०० झाडे तोडून टाकली. या धक्कादायक प्रकारानंतर मनपाच्या उद्यान विभागाने कंपनीला दंड स्वरूपात २१ लाख ९५ हजार रुपये भरावेत म्हणून नोटीस पाठविली. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनात एकच खळबळ उडाली आहे. रक्कम न भरल्यास मनपाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

मनपाचे मुख्य उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले की, कंपनीचे व्यवस्थापक नितीन साबळे यांनी कॅम्पसमधील १७ झाडे तोडण्यासाठी पंधरा दिवसांपूर्वी मनपाच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे अर्ज केला. वृक्ष प्राधिकरणाने १७ झाडे तोडण्याची परवानगी दिली. मात्र, कंपनीने सुमारे चारशे झाडे तोडली. मनपा कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. झाडे तोडण्याची परवानगी नसताना परस्पर अनधिकृतपणे वृक्षतोड केल्याबद्दल कंपनीला महाराष्ट्र नागरी झाडांचे संरक्षण व संवर्धन अधिनियम १९७५ च्या कलम २१ (१) अन्वये २१ लाख ९५ हजार रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. डिस्टीलरी कंपनीने अद्याप दंड भरला नसल्याचे त्यांनी सांगितले.

कंत्राटदाराला ८० हजार रुपये दंडराष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाकडून पैठण ते छत्रपती संभाजीनगर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. प्रकल्पाच्या व्ही. पी. शेट्टी कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराने रस्त्याच्या कामात अडथळा नसलेल्या नक्षत्रवाडी-कांचनवाडी रोडवरील दोन झाडांची छाटणी केली. व्ही. पी. शेट्टी कन्स्ट्रक्शन कंपनीला ८० हजार रुपये दंडाची नोटीस बजावली होती. कंत्राटदाराने तातडीने ८० हजार रुपयांचा दंड भरला.

सेंट फ्रान्सिस शाळेला २५ हजार दंडजालना रोडवरील सेंट फ्रान्सिस शाळेने मनपाची परवानगी न घेता नीलगिरीची झाडे तोडली. तक्रार मिळताच मनपाकडून शहानिशा करण्यात आली. शाळेला २५ हजार रुपये दंडाची नोटीस दिली. त्यांनी तत्काळ दंडाची रक्कम भरली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका