शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

'लोकच म्हणतील, लाव रे तो व्हिडिओ'; संभाव्य भाजपा-मनसे युतीवर वडेट्टीवारांचा चिमटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 20:14 IST

Vijay Vadettivar News : देशातच ओबीसींना वगळून निवडणुका होणे शक्य नाही.

ठळक मुद्देहे त्यांचेच प्रेमळ शब्द आहेत. मी मनाने तर काही म्हटलेलो नाही

औरंगाबाद: भाजपा (BJP ) आणि मनसे ( MNS) युतीबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thakarey ) आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांची आज पुन्हा बैठक झाली. यावर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ( Vijay Vadettivar) यांना विचारले असता ते म्हणाले, ही युती झाली तर लोकच आधी म्हणतील, लाव रे तो व्हिडिओ. हे त्यांचेच प्रेमळ शब्द आहेत. मी मनाने तर काही म्हटलेलो नाही, असा चिमटा त्यांनी संभाव्य मनसे व भाजपा युती चर्चेबाबत काढला.

विजय वडेट्टीवार दोन दिवस औरंगाबाद-जालन्याच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी सायंकाळी ते औरंगाबादेत आले. विभागीय आयुक्तालयात मराठवाड्यातील आश्रम शाळांच्या समस्यांबाबत आढावा बैठक घेण्यापूर्वी त्यांना पत्रकारांनी बोलते केले. ते म्हणाले, मागसवर्ग आयोगासाठी लागणारा जो निधी आहे, ते देण्यात येईल. ओबीसी आरक्षणपेक्षा निधी मोठा नाही. आम्हाला हक्काचे आरक्षण मिळावे आणि ते टिकावे हीच भूमिका आहे. यासाठी माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांच्या मार्फत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर येत्या आठवड्यात सुनावणी होणे शक्य आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

ओबीसींना वगळून निवडणुका शक्य नाहीतओबीसी आरक्षणाचा निर्णय केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादीत नाही, तो पुर्ण देशासाठी लागू झालेला आहे. त्यामुळे देशातच ओबीसींना वगळून निवडणुका होणे शक्य नाही. त्यासाठी इम्पिरीकल डाटा सर्व राज्यांना मिळवावा लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने केंद्रशासनाकडून तो डाटा मिळावा, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारMNSमनसेBJPभाजपाRaj Thackerayराज ठाकरेchandrakant patilचंद्रकांत पाटीलAurangabadऔरंगाबाद