शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

गाव ‘पाणीदार’ करण्यासाठी कोल्ही ग्रामस्थांची वज्रमूठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:37 IST

तालुक्यातील कोल्ही गावात ‘तुफान आलंया’ अर्थात पाणी फाऊंडेशनच्या कामाला रविवारी सुरुवात झाली. अभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत कोल्ही गावानेही सहभाग घेतला असून रविवारी गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांनी स्वत: श्रमदान करून या कामाचा शुभारंभ केला.

मोबीन खान ।लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : तालुक्यातील कोल्ही गावात ‘तुफान आलंया’ अर्थात पाणी फाऊंडेशनच्या कामाला रविवारी सुरुवात झाली. अभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत कोल्ही गावानेही सहभाग घेतला असून रविवारी गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांनी स्वत: श्रमदान करून या कामाचा शुभारंभ केला. येथील कामात भारतीय जैन संघटनाही सहभागी झाली आहे. वैजापूर तालुक्यातील गावे पाणीदार करण्यासाठी ही संघटना सक्रिय झाली असून अनेक गावात या संघटनेकडून मदत करण्यात येत आहे.भविष्यात दुष्काळामुळे शेतकºयांवर आत्महत्येची वेळ येऊ नये, म्हणून वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावात छोटे बंधारे आणि चरांच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे करून पाणी अडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. रविवारी कोल्ही येथील ग्रामस्थांनीदेखील स्पर्धा जिंकण्यासाठी कंबर कसली आहे.तालुक्यात दुष्काळामुळे गेल्या चार वर्षात सर्वाधिक आत्महत्यांची नोंद झाली आहे. मात्र, पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमात सहभागी होऊन गावकºयांनी दुष्काळावर मात करण्याचा निर्धारच केला आहे. यासाठी गावकरी रात्रीचा दिवस करून श्रमदानाचे काम करत आहेत. या स्पर्धेने गावकºयांना जगण्याची नवी उमेद मिळाली आहे. गावच्या मातीत लहान, थोर हात राबत आहेत. दुष्काळावर मात करण्यासाठी राबविण्यात येणाºया स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकविण्याचा विश्वास कोल्ही गावातील तरुण पिढीने व्यक्त केला. वैजापूर तालुक्यात दुष्काळाची तीव्रता गेल्या चार ते पाच वर्षात सातत्याने वाढतच चाललेली आहे. वैजापूरमध्ये या वर्षापासून पाणी फाऊंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गौतमचंद संचेती, मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रवीण पारख, औरंगाबाद जिल्हा ग्रामीण अध्यक्ष नीलेशकुमार पारख, वैजापूर तालुकाध्यक्ष विशाल संचेती, सुधाकर पवार, राजेश संचेती, महेश हिरण, दीपक सारडा, गौतम संचेती, संजय मालपाणी, प्रफुल्ल संचेती, परेश संचेती, सागर संचेती, दीपक संचेती, सचिन बाफना, प्रवीण संचेती, संजय भन्साळी, डॉ. बोरा, प्रल्हाद अरसूळ, दिनेश सोनवणे, अंबादास लांडगे, साई, रवी या जैन संघटनेचे हातही श्रमदानाला लागल्यामुळे गावकºयांचा आत्मविश्वास दुणावला आहे.दरम्यान, भर उन्हात रविवारी हजारो नागरिक या गावात उत्साहाने सहभागी झाल्याने ग्रामस्थांचा उत्साहही वाढला आहे.गावातील लोक त्यांच्या त्यांच्या गावामध्ये भरपूर श्रमदान करणार आहेत. तरी सुध्दा श्रमदानानंतरही काही कठीण काम गावकºयांना श्रमदानाने करता येणे शक्य नाही. कारण प्रत्येक गावात माथ्यापासून पायथ्यापर्यंत काम करावे लागते.तसेच विशिष्ट काम श्रमदानाने केल्यानंतर खडकात करावे लागणारे काम श्रमदानाने होऊ शकत नाही, असा ‘बीजेएस’चा अनुभव आहे. त्यामुळे ‘बीजेएस’ने यंत्रसामुग्री पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.ज्या ज्या गावांची मशीनमध्ये डिझेल भरण्याची तयारी असेल अशा गावांना जेसीबी, पोकलेन मशीनद्वारे काम करुन दिले जाणार आहे, असे भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गौतमचंद संचेती यांनी सांगितले.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाwater shortageपाणीकपात