शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पाण्यासोबतच टँकरची टंचाई; कन्नड तालुक्यात मंजुरी मिळूनही ग्रामस्थांच्या नशिबी प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 18:17 IST

टँकर येत नसल्याने नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे

कन्नड (औरंगाबाद ) : उष्णतेचा पारा ४४ अंशांवर पोहोचला असताना कन्नड तालुक्यातील पाणीटंचाईच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे येथील बहुतांश गावांतून पाण्याच्या टँकरची मागणी होत आहे. विशेष म्हणजे अनेक गावांत पाण्याचे टँकर मंंजूरही झाले आहेत. मात्र, तरीही टँकर येत नसल्याने नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, प्रशासनाने दखल घेऊन त्वरित टँकर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे. 

कन्नड तालुक्यात वाढणाऱ्या तापमानामुळे भूगर्भातील पाणी पातळी झपाट्याने खालावत आहे. परिणामी, विहिरींनी तळ गाठला असून, टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करणाऱ्या गावांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पाणीटंचाईची झळ सोसावी लागू नये म्हणून प्रशासनही पाहणी करून टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेशही देत आहेत. मात्र, टँकर पुरवठादाराकडून टँकर पुरविण्यास विलंब होत आहे. त्यामुळे त्याचा फटका नागरिकांना बसत असून पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ नागरिकांसह महिलांवर आली आहे.

तालुक्यातील आठेगाव, शिवराई, दिगाव, शेलगाव, दहिगाव, आडगाव (पि.), मोहरा, आमदाबाद मोहाडी, सासेगाव, बरकतपूर, रायगाव, रुईखेडा, जवळी खुर्द व जवळी बु., कानडगाव (क.), देवळी, गणेशपूर, पिंपरखेडा ग्रामपंचायतींतर्गत पिंपळवाडी, सपकाळवाडी, पिंपरखेडा, सफियाबाद, नाचनवेल, कोपरवेल, जवखेडा खुर्द, शेवता, निपाणी, गव्हाली, ताडपिंपळगावअंतर्गत गाडीवस्ती लोहगाव, निमडोंगरी, बनशेंद्रा, सारोळा, देवगाव रंगारी, देवगाव रंगारी ग्रामपंचायतींतर्गत खोतवाडी, माळेगाव ठोकळ, जामडी (ज.), वाकद, चापानेर, डोणगाव, विठ्ठलपूर, कविटखेडा, देवळाणा, जवखेडा बु., सिरजापूर व शिरजापूर तांडा, डोंगरगाव, रेल व रेलतांडा, कनकावतीनगर, गौतमनगर, वडोद, बिबखेडा, जैतापूर, लंगडातांडा, भांबरवाडी, चांभारवाडी, देवपुडी, हतनूर, आदर्श वसाहत, माटेगाव, बोलटेक, बोलटेक तांडा, रोहिला खुर्द या गावांना ७० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी मंजूर झालेले टँकर येत नसल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कारभाराविरुद्ध रोष व्यक्त केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन मंजूर झालेले टँकर त्वरित सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

टँकर द्या हो, नागरिकांचा टाहो च्कन्नड तालुक्यातील मेहेगाव, बहिरगाव व चिखलठाणअंतर्गत गोपाळवाडी या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश चार दिवसांपूर्वीच देऊनही टँकर उपलब्ध झालेले नाहीत, तर शिपघाट, ठाकूरवाडी, हिवरा वाडी, लामणगाव, धारण खेडा, नेवपूरअंतर्गत एकलव्य वस्ती येथील टँकरचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात दाखल आहेत. दिवसेंदिवस टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी वाढत आहे. पुढच्या महिन्यात अधिक तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार असल्याने प्रशासनाला खबरदारी घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :WaterपाणीAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदdroughtदुष्काळ