शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

संस्थाचालकासह शिक्षकांची ७० लाखांची फसवणूक करणारा शिपाई अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 19:50 IST

आमिष दाखवून संस्थाचालकांसह २२ शिक्षकांची तब्बल ७० लाखांची फसवणूक करणाऱ्या शिपायाला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देसंस्थाचालकासह शिक्षकांना गंडविले वाढीव तुकड्यांसह शिक्षकांची संच मान्यता मिळवून देण्याचे आमिष  

औरंगाबाद : शाळेच्या वाढीव तुकड्यांसह शिक्षकांना संच मान्यता मिळवून देतो, असे आमिष दाखवून संस्थाचालकांसह २२ शिक्षकांची तब्बल ७० लाखांची फसवणूक करणाऱ्या शिपायाला पुंडलिकनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. सुनील गोपाल चौधरी (४०, रा. वाळूज महानगर, मूळ रा. धरणगाव, जि. जळगाव) असे अटकेतील शिपायाचे नाव आहे. 

पोलीस निरीक्षक एल. ए. सिनगारे म्हणाले की, तक्रारदार मेधा चंद्रकांत रेखे या त्रिमूर्ती शिक्षणसंस्थेच्या संचालक आहेत. त्यांच्या संस्थेची बजाजनगर येथे त्रिमूर्ती हायस्कूल ही शाळा आहे. या शाळेतील वाढीव तुकड्यांना मान्यता आणि तेथे कार्यरत शिक्षकांची जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागाकडून   संच मान्यता शिक्षण विभागाकडून आणून देतो,   शाळेतील २२ कर्मचाऱ्यांच्या संच मान्यता करणे असल्याने वैयक्तिक संच मान्यतेसाठी त्याने साडेतीन ते चार लाख रुपये खर्च सांगितला. त्याच्यावर विश्वास ठेवून सर्व शिक्षकांनी पैसे गोळा करून संस्थाचालक महिलेमार्फत सुनीलला तीन टप्प्यांत ७० लाख रुपये दिले.

ही रक्कम हातात पडल्यानंतर तो तक्रारदारांना भेटतच नव्हता.   गुन्हा दाखल झाल्याचे समजताच चौधरी पसार झाला होता.   तो न्यायालयात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिनगारे यांना मिळाली. त्यांनी लगेच न्यायालयातील पैरवी अधिकारी, तसेच कर्मचारी सचिन सांगळे आणि इतरांनी त्यास अटक केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसArrestअटक