शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

वर्दळीच्या रस्त्यावर पादचारी महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे गंठन दुचाकीस्वारांनी हिसकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 22:54 IST

शहरातील वर्दळीच्या फाजलपुरा ते एस.टी. कॉलनी रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले.

औरंगाबाद : शहरातील वर्दळीच्या फाजलपुरा ते एस.टी. कॉलनी रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले. रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

काचीवाडा येथील रहिवासी योगिता सुरेश बागले (२४) या रविवारी सकाळी काचीवाडी येथून फाजलपुरा परिसरातील एस.टी. कॉलनीतील शिकवणी सेंटरमध्ये पुतण्याला सोडण्यासाठी गेल्या होत्या. पुतण्याला सोडून त्या पायी घरी परत जात होत्या. फाजलपुरा ते एस.टी. कॉलनी रस्त्यावरील स्वस्त धान्य दुकानासमोर त्या असताना समोरून आलेल्या काळ्या रंगाच्या दुचाकीस्वार दोन चोरट्यांनी त्यांच्याजवळ येताच दुचाकीचा वेग कमी केला. दुचाकीवर मागे बसलेल्या एकाने अचानक त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून घेतले आणि ते दुचाकीने सुसाट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघून गेले. योगिता यांनी आरडाओरड करीत त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. विशेष म्हणजे स्वस्त धान्य दुकानासमोर पंधरा ते वीस ग्राहक धान्य खरेदीसाठी उभे होते. ते ग्राहक धान्य घेण्यात व्यस्त असल्याने त्यांचे चोरट्यांकडे लक्ष नव्हते. यामुळे योगिता यांच्या मदतीसाठी कोणीही धावून आले नाही. या घटनेनंतर योगिता यांनी लगेच सिटीचौक पोलिसांना घटनेची माहिती कळविली. योगिता आणि त्यांचे पती सुरेश बागले यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविली.

पोलिसांकडून शोध सुरूसकाळी अकरा वाजता वर्दळीच्या एस.टी. कॉलनी रस्त्यावर पादचारी महिलेचे दागिने चोरट्यांनी हिसकावून नेल्याचे कळताच पोलीस निरीक्षक दादासाहेब सिनगारे, उपनिरीक्षक राजेंद्र बांगर आणि कर्मचाºयांनी चोरट्यांचा शोध सुरू केला. घटनास्थळ परिसर मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी तपासणी सुरू केली.मास्क घालून लुटले मिनी गंठणपकडले जाऊ नये, तसेच सीसीटीव्ही कॅमेºयात आपला चेहरा दिसू नये, याकरिता चोरट्यांनी चेहºयाला मास्क लावलेला होता. शिवाय त्यांच्या मोटारसायकलच्या नंबर प्लेटवर मागील आणि समोरील बाजूला त्यांनी नंबर टाक लेला नव्हता, असे योगिता यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद