शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

अदालत रोडवर भरधाव शहर बसने पादचाऱ्याला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 15:34 IST

अदालत रस्त्यावरील जिल्हा बॅंकेसमोर मागून सुसाट आलेल्या शहर बसने त्यांना चिरडले .

औरंगाबाद: भरधाव शहर बसने पादचाऱ्याला चिरडल्याची घटना अदालत रोडवरील जिल्हा बॅंकेसमोर बुधवारी सकाळी ९:४५ वाजेच्या सुमारास घडली . याविषयी वेदांतनगर ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली . 

लक्ष्मण बाबूराव पाचे (४२, रा . चिकलठाणा ) असे मयताचे नाव आहे . पोलिसांनी सांगितले की , पाचे हे अदालत रोड परिसरातील एका बांधकाम व्यवसायिकाकडे नोकरी करीत होते . नेहमीप्रमाणे आज सकाळी ते जेवणाचा डबा हातात घेऊन घरून निघाले. कार्यालयापासून जवळच असलेल्या अदालत रस्त्यावरील जिल्हा बॅंकेसमोर मागून सुसाट आलेल्या शहर बसने त्यांना चिरडले . विशेष म्हणजे पाचे हे रस्त्याच्या डाव्या बाजूने पायी चालत असतांना त्यांना उडविल्यानंतर सुमारे १५ ते २० फुट फरफटत नेले . 

या घटनेत मागील चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झालेल्या पाचे यांना प्रत्यक्षदर्शी आणि बसचालकाने उचलून फूटपाथवर ठेवले यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी पोलीसचे वाहन अथवा रुग्णवाहिकेला फोन केला . मात्र, दोन्ही वाहने येण्यास विलंब होत असल्याचे पाहून नागरिकांच्या सांगण्यावरून चालकाने पाचे यांना बसमधून घाटी रुग्णालयात दाखल केले . तेथे उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. या विषयी वेदांतनगर ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली . पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शंकर डुकरे तपास करित आहेत.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू