हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने २० मे रोजी भाटेगाव येथील शेतकर्यांना पीक प्रात्याक्षिक कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमास रोहिणी शिंदे, अजयकुमार सुगावे, कैलास गीते, डोंगरकडा कृषी पर्यवेक्षक नंदु वाईकर, वारंगाफाटा येथील कृषी सहाय्यक संतोष वाघमारे, ए. बी. राठोड, चिखली येथील आर. एल. पोहनकर यांची उपस्थिती होती. या मान्यवरांनी प्रसंगी माती परिक्षणाचे महत्व, महिला सक्षमीकरण, बीज उगवण शक्ती, खरीप हंगामातील प्रमुख पीक कापूस उत्पादन तंत्रज्ञान आदी विषयी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात आले. खरीपाच्या बाबतीत बीज प्रक्रियेचे महत्व, खत व्यवस्थापन, कापूस पिकाचे कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. २०१४ करीता पीक प्रात्यक्षिकाकरीता मुख्य पीक कापूस, सोयाबीन, केळी पिकाकरीता शेतकर्यांची निवड करण्यात आली. पीक प्रात्यक्षिकास विद्यापीठातंर्गत विकसीत तंत्रज्ञान व उत्पादन वाढविण्याचे कार्य कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने करण्यात येत आहे. (वार्ताहर)
भाटेगाव येथे पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम
By admin | Updated: May 21, 2014 00:48 IST