शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात जाळपोळीनंतर शांतता; १६ पोलिस जखमी, ४०० ते ५०० जणांवर गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 06:27 IST

या घटनेचा भाविकांच्या  उत्साहावर किंचितही परिणाम जाणवला नाही.   

छत्रपती संभाजीनगर : किराडपुऱ्यातील राम मंदिरालगतच्या परिसरात बुधवारी मध्यरात्री झालेल्या जाळपोळीच्या घटनेनंतर शहरात गुरुवारी दिवसभर सर्वत्र शांतता होती. समाजकंटकांनी केलेल्या जाळपोळीत पोलिस दलाची १५ आणि खासगी ३ वाहने खाक झाली.  जमावाने केलेल्या दगडफेकीत १६ पोलिस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी ४०० ते ५०० जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा भाविकांच्या  उत्साहावर किंचितही परिणाम जाणवला नाही.   

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार काही तरुण बुधवारी रात्री कमान उभारत होते. तेव्हा एका दुचाकीला धक्का लागल्यामुळे दोन तरुणांमध्ये बाचाबाची झाली. तेथे तैनात पोलिसांनी वाद मिटवला. त्यानंतर काही वेळाने दोन्ही बाजूंकडून घोषणा व दगडफेक सुरू झाली. पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने पोलिसांच्या गाड्यांना टार्गेट केले. 

उजाडण्यापूर्वीच उचलली वाहने 

पाेलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर रस्त्यावर जाळलेली वाहने उजाडण्यापूर्वीच पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने हटवली. त्याशिवाय रस्त्यावरील दगडांचा खच उचलून पाण्याने रस्ता धुतला. त्यामुळे सकाळी मंदिरात दर्शनास येणाऱ्या भाविकांना जाळपोळीच्या खाणाखुणाही दिसल्या नाहीत.  

रामनवमी शांततेत

राम मंदिरात गुरुवारी सकाळीच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. या घटनेनंतर शहरात सर्वत्र तणावपूर्ण शांतता आहे.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRam Navamiराम नवमीPoliceपोलिस