शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आता घंटाभर नव्हेतर, सेकंदात वीजबिल भरणा; ऑनलाईनने बिलात सूट अन तत्काळ पोच 

By साहेबराव हिवराळे | Updated: April 8, 2023 12:56 IST

महावितरणने वेबसाईटवर ऑनलाइन बिल पेमेंट सुविधेसह मोबाइल ॲप उपलब्ध करून दिले आहे.

छत्रपती संभाजीनगर : वीजबिलात मिळणारी सवलत आणि रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत असल्याने महावितरणच्या ग्राहकांकडून वीजबिल ऑनलाइन भरण्यास प्राधान्य मिळत आहे. मार्च एण्डला छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील ३ लाख ५१ हजार ९५७ ग्राहकांनी ८४ कोटी ४ लाख रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केला आहे. घरबसल्या वीजबिल भरण्याकडे कल वाढता आहे.

महावितरणने वेबसाईटवर ऑनलाइन बिल पेमेंट सुविधेसह मोबाइल ॲप उपलब्ध करून दिले आहे. सर्व लघुदाब ग्राहकांना चालू व मागील बिले पाहण्यासाठी व भरण्यासाठी नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डसह मोबाइल वॉलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध झाला आहे. महावितरणच्या आवाहनास ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे त्यांचे बिल भरणा केंद्रासमोरील रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत आहे. शहर मंडळात १ लाख ७४ हजार ३८५ ग्राहकांनी ४५ कोटी ७३ लाख, ग्रामीण मंडळात १ लाख २५ हजार ३९ ग्राहकांनी २६ कोटी ६१ लाख तर जालना मंडळात ५२ हजार ५३३ ग्राहकांनी ११ कोटी ७० लाख रुपयांचे वीजबिल ऑनलाइन भरले आहे.

बिलात ०.२५ टक्के सूटग्राहकांना वीजबिलाचे ऑनलाइन पेमेंट सुलभतेने करता यावे व अशा ग्राहकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी क्रेडिट कार्ड वगळता नेट बॅंकिंग, डिजिटल वॉलेट, कॅश कार्ड, डेबिट कार्ड व यूपीआय पद्धतीने वीजबिल भरल्यास महावितरणने ग्राहकांना ही सेवा मोफत उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाइन पेमेंट केल्यास वीजबिलात ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सवलत मिळते.

तत्काळ मिळते पोचवीजबिलाचे ऑनलाइन पेमेंट केल्यास ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइलवर एसएमएसद्वारे त्वरित पोच मिळते. तसेच वेबसाईटवर ‘पेमेंट हिस्ट्री’ तपासल्यास वीजबिल भरणा तपशील व पावतीही उपलब्ध होते. त्यामुळे ऑनलाइन बिल भरण्याच्या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

‘गो-ग्रीन’द्वारे वर्षाला १२० रुपये वाचवामहावितरणने लघुदाब ग्राहकांना वीजबिल ऑनलाइन भरण्यासह ई-मेलद्वारे वीजबिल मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वीजबिलाच्या फक्त ई-मेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा १० रुपये सूट मिळते. छापील कागदासह ई-मेलद्वारेही वीजबिलाची सोय आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरणonlineऑनलाइन