शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

रुग्णांनी मोफत औषधी मागितली, शासनाने दिले औषधांचे दुकान; गरिबांचा खिसा रिकामा होणारच

By संतोष हिरेमठ | Updated: March 5, 2024 14:11 IST

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या ४० वर्षांपासून रुग्णांना औषधीच मिळत नाहीत. कारण या ठिकाणी औषधालयच नाही

छत्रपती संभाजीनगर : औषधी खरेदी करून ती रुग्णांना मोफत उपलब्ध करून देण्यासाठी ‘औषधनिर्माता’ हे पद पुनर्जीवित करण्याची मागणी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने शासनाकडे केली आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करून शासनाने याठिकाणी जेनेरिक औषधी दुकान सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे रुग्णांना औषधी खरेदी करण्याचीच वेळ ओढावणार आहे.

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या ४० वर्षांपासून रुग्णांना औषधीच मिळत नाहीत. कारण या ठिकाणी औषधालयच नाही आणि शासनाकडूनही औषधी-गोळ्यांचा पुरवठा होत नाही. कारण या ठिकाणचे औषधनिर्मात पद रिक्तच राहिले आणि कालांतराने व्यपगत झाले.

रुग्णालयाने शासनाकडे केलेली मागणीदंत उपचारासाठी दाखल होणारे बहुतांश रुग्ण आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतात. त्यांना खासगी दुकानातून औषधी-गोळ्या खरेदी करणे दुरापास्त असते. त्यामुळे त्यांना मोफत औषधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. औषधींची मागणी अथवा संस्था स्तरावरून खरेदी करून रुग्णांना मोफत वितरित करता येण्यासाठी औषधनिर्माता हे पद पुनर्जीवित करण्यात यावे, अशी मागणी शासकीय दंत महाविद्यालय रुग्णालय प्रशासनाने शासनाकडे केली आहे.

शासनाने घेतलेला निर्णयराज्यभरातील १८ शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालय व रुग्णालयात संस्थांमार्फत जेनेरिक औषधी दुकाने सुरू करण्यास १ मार्च रोजी शासन निर्णयाद्वारे परवानगी देण्यात आली. यात शहरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचा समावेश आहे.

घाटीत जनऔषधी केंद्र असताना आता डेंटलसाठी ‘दुकान’घाटी रुग्णालयात सध्या जनऔषधी केंद्र आहे. शासकीय दंत महाविद्यालयापासून अवघ्या काही अंतरावरच हे केंद्र आहे. हे केंद्र असताना शासकीय दंत महाविद्यालयात जेनेरिक औषधी दुकान सुरू करण्यास परवानगी देण्यात आली.

ब्रँडेड औषधी मारणार रुग्णांच्या माथीजेनेरिक औषधी केंद्रात जेनेरिक औषधी उपलब्ध नसल्यास ब्रँडेड औषधी, सर्जिकल साहित्य आदींच्या दर्शनी मूल्यावर किमान १० टक्के सवलत रुग्णांना देण्याचे बंधनकारक राहील, अशी अट टाकण्यात आली आहे. दंत रुग्णांना मोफत औषधी उपलब्ध करून देण्याऐवजी खिसाच रिकामा करण्यावर भर दिला जात असल्याची ओरड होत आहे.

मोफत औषधी मिळावीघाटी रुग्णालयाप्रमाणे शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातही रुग्णांना मोफत औषधी मिळावी. शासकीय दंत महाविद्यालयाला आवश्यक असलेले औषधनिर्माता पद उपलब्ध करून दिले पाहिजे.- ॲड. इकबालसिंग गिल, सदस्य, अभ्यागत समिती.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmedicineऔषधं