शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

रुग्ण वाढल्याने रोज लागतो दीड कोटी लिटर लिक्विड ऑक्सिजन; पुरवठा मर्यादित असल्याने रुग्णालयांची धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 15:41 IST

लिक्विड ऑक्सिजनच्या मागणी व पुरवठ्यात ३ दिवसांचे अंतर

ठळक मुद्देपुरवठ्यावर मर्यादा आल्याने लिक्विड ऑक्सिजनसाठी रुग्णालयांची धावाधाव तुटवडा नाही, तरी यापुढे पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मोठी कसरत

- योगेश पायघन 

औरंगाबाद : कोरोनाबाधित रुग्णांकरिता ऑक्सिजनचा वापर नेहमीपेक्षा पाच ते सहापट वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऑक्सिजन सुविधा असलेल्या सुमारे ११०० खाटांवर उपचार घेत असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात वैद्यकीय यंत्रणेसह उत्पादक, पुरवठादारांनाही मर्यादा पडू लागल्या आहेत. सध्या तुटवडा नसला तरी बहुतांश रुग्णालयांची मदार द्रवरूप ऑक्सिजनवर असून पुणे मुंबईतून मागणी केल्यावर तिसऱ्या दिवशी पुरवठा होत आहे. त्यामुळे सध्या ऑक्सिजन पुरवठ्याची मदार जिल्ह्यातील उपलब्ध उत्पादक प्लांट, साठवणुकीवरच आहे. त्यामुळे पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उत्पादक, पुरवठादार, रुग्णालयांची धावपळ सुरू आहे.

द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा पुणे व मुंबईतून प्रत्येकी २ अशा ४ कंपन्या करतात. तर शहरालगत ३ प्लांट आहेत. ३ पैकी वाळूज आणि गेवराई तांडा येथील प्लांट ८० टक्के वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करतात. तर तिसरा प्लांट केवळ औद्योगिक ऑक्सिजन पुरवठा करतो. लिक्विड ऑक्सिजनच्या राज्यभरातून वाढलेल्या मागणीमुळे पुरवठ्यावर प्रचंड ताण आहे. त्यात शहरातील रुग्णालयांचा ९० टक्के भार लिक्विड ऑक्सिजनवर आहे. याच पद्धतीने रुग्णसंख्या वाढत राहिल्यास १५ दिवसांनंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीबद्दल रुग्णालयांनी ऑक्सिजन पुरवठ्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. 

पूर्वी ज्या रुग्णालयात एक जंबो सिलिंडर दोन तास चालत असे कोरोना रुग्णांना हाय फ्लोने ऑक्सिजन लागत असल्याने अवघ्या १० मिनिटांत सिलिंडर रिकामे होत आहे. जेथे मागणी १० सिलिंडर होती. तेथील मागणी ६० ते ७० सिलिंडर झाली असल्याने पुरवठ्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागत असल्याचे पुरवठादारांनी लोकमतला सांगितले. औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजय काळे यांनी वरिष्ठ अधिकारी व प्रशासनाला माहिती पाठवण्यात व्यस्त असल्याचे सांगून ऑक्सिजन मागणी व पुरवठ्यासंबंधी बोलण्याचे टाळले.

१ कोटी ५८ लाख ४० हजार लिटर ऑक्सिजन लागतो २४ तासांतक्रिटिकल रुग्णाला ३० लिटर प्रतिमिनिटप्रमाणे २४ तासांत ४३ हजार लिटर आॅक्सिजन लागतो. तर मध्यम रुग्णाला १० लिटर दर मिनिटानुसार १४ हजार ४०० लिटर आॅक्सिजन लागत आहे. सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या बाधितांपैकी सुमारे ११०० रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. किमान गरजेचा विचार केल्यास १४ हजार ४०० प्रतिरुग्णाचा २४ तासांतील वापर लक्षात घेतल्यास १ कोटी ५८ लाख ४० हजार लिटरपेक्षा अधिक आॅक्सिजन दररोज वापरला जात आहे. त्यातही अडीचशेहून अधिक रुग्ण जे व्हेंटिलेटर व हाय फ्लो ऑक्सिजनवर आहेत. त्यांना किमान आवश्यकतेच्या तिप्पट ऑक्सिजनची गरज भासते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

औरंगाबादेतील ३ पैकी दोनच प्लांटमधून वैद्यकीय आॅक्सिजन पुरवठारात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत टँकरची वाहतूक बंदवेळोवेळी वीज खंडित होत असल्याने रीफिलिंगवर परिणामदोन प्लांटमधून दिवसभरात दीड हजार सिलिंडरची रीफिलिंगमागणी दिवसाकाठी अडीच हजार सिलिंडरचीलिक्विड आॅक्सिजन नसल्यास भिस्त केवळ जंबो सिलिंडरवर

दोनच उत्पादकांकडून ८० टक्के वैद्यकीय ऑक्सिजन३ पैकी २ उत्पादक वैद्यकीय ऑक्सिजनचा ८० टक्के  पुरवठा करत आहेत. सध्याची गरज लक्षात घेऊन उपलब्ध तिन्ही प्लांटमधून सध्यातरी १०० टक्के वैद्यकीय आॅक्सिजनचा पुरवठा गरजेचा आहे. लिक्विड आॅक्सिजन पुरवठा करणारे टँकर रात्री ११ ते सकाळी ५ पर्यंत वाहतूक करत नाहीत. हा कंपनीचा नियम असला तरी सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत रात्रीही वाहतूक झाल्यास पुरवठ्यात खंड पडणार नाही. वारंवार वीज खंडित होणेही पुरवठ्यावर परिणाम करत आहे. तसेच बीड, जळगाव, नगर, धुळे, मालेगाव, बुलडाणा येथील पुरवठादार जुने असले तरी तेथील वाढलेल्या मागणीचाही जिल्ह्याच्या कोट्यावर परिणाम दिसून येत आहे. -एक आॅक्सिजन पुरवठादार

मागणी व पुरवठ्यात  ३ दिवसांचे अंतरमागणी झालेल्या दिवशी लिक्विड आॅक्सिजनचा पुरवठा होणे अपेक्षित आहे. पुणे, मुंबईत उत्पादन पूर्ण क्षमतेने होत असले तरी मागणी वाढली असल्याने तेथून पुरवठ्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे मागितलेल्या दिवशी लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. रीफिलर, डीलरची मागणी आणि पुणे, मुंबईहून येणाऱ्या लिक्विड आॅक्सिजनमध्ये सध्या तीन दिवसांचा फरक आहे. मागणी केली त्याच दिवशी पुरवठा मिळाल्यास पुरवठ्यातील अडचणी दूर होतील. त्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत.- राजकुमार चोपडा, गॅस उत्पादक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद