शहरं
Join us  
Trending Stories
1
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
2
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
3
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
4
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
5
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
6
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
7
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
8
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
9
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
10
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
11
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
12
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
13
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
14
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
15
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
16
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
17
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
18
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
19
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
Daily Top 2Weekly Top 5

‘क्रिमपोस्ट’चा पदभार पठाण यांनी स्वीकारला

By admin | Updated: July 23, 2014 00:20 IST

हिंगोली : येथील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा पदभार अखेर यापूर्वी या पदावर नियुक्त झालेले उदगीर येथील उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी मंगळवारी प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी गिरीकडून स्वीकारला.

हिंगोली : येथील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा पदभार अखेर यापूर्वी या पदावर नियुक्त झालेले उदगीर येथील उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी मंगळवारी प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी गिरी यांच्याकडून स्वीकारला.
हिंगोली येथे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या पदावरून गेल्या महिनाभरापासून चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. ‘क्रिमपोस्ट’ असलेल्या या पदावर आपली वर्णी लागावी यासाठी अनेक अधिकाऱ्यांकडून ‘फिल्डिंग’ लावली जाते. यामध्ये काही यशस्वी ठरतात तर काही यशस्वी ठरलेल्यांच्या पदरी अपयशही येते. अशीच काहीशी अवस्था हिंगोली येथील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या पदावरून झालेली आहे. या पदावर आठ महिन्यांपूर्वी रूजू झालेले अभिमन्यू बोधवड यांची गेल्या महिन्यात जालना येथे सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारीपदी बदली झाली होती. त्यांच्या जागी उदगीर येथील उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांची नियुक्ती झाली होती. बोधवड यांनी अवेळी झालेल्या बदलीच्या विरोधात महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांच्याकडे गाऱ्हाणे मांडल्यानंतर धस यांनी बोधवड यांच्या बदलीस स्थगिती दिली होती. तसे आदेशही विभागीय आयुक्तांकडून आले होते. नंतर राज्य पातळीवर हालचाली होऊन बोधवड यांच्या बदलीवरील स्थगिती उठविण्यात आली. त्यामुळे पठाण यांचा मार्ग मोकळा झाला. पठाण पदभार स्वीकारणार असे वाटत असतानाच बोधवड यांनी या बदलीविरोधात ‘मॅट’ मध्ये धाव घेतली. त्यानंतर मॅटने बोधवड यांच्या बदलीला स्थगिती दिली. त्यानंतर बोधवड पुन्हा कामावर रूजू झाले. याच वेळी बोधवड यांच्यावर औंढा येथे तहसीलदारपदी कार्यरत असताना बनावट शिधापत्रिकाद्वारे धान्य उचलून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कळमनुरी पोेलिसांत गुन्हा दाखल झाला.
त्यानंतर वसमत येथील न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला, आणि कळमनुरी पोलिसांनी रात्रीच्या १२ वाजता बोधवड यांच्या औरंगाबाद येथील निवासस्थानी जाऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांना औरंगाबाद येथील खंडपीठाने जामीन मंजूर केल्याचे समजल्यानंतर सोडून देण्यात आले. या प्रकरणातील अन्य तीन आरोपींना मात्र अद्यापही कळमनुरी पोलिसांना अटक करता आलेली नाही, हे विशेष होय.
याप्रकरणी बोधवड यांना विभागीय आयुक्तांनी तातडीने निलंबित केले आणि पुन्हा एकदा पठाण यांच्या नियुक्तीचा मार्ग सुकर झाला. त्यानंतर पठाण यांनी २२ जुलै रोजी प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी गिरी यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यामुळे या ‘क्रिमपोस्ट’ साठी पडद्यासमोर आणि पडद्यामागे किती हालचाली झाल्या, याचीच चर्चा जिल्हाभरातून होताना दिसून येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)