शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरू कारभारी काळे यांनी विकसित केलेल्या कृषी प्रणालीला पेटंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 12:08 IST

कारभारी काळे यांच्या संशोधनाला १० वे पेटंट जाहीर

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी विकसित केलेल्या कृषी भूस्थानिक माहिती प्रणालीच्या संशोधनाला केंद्र शासनाच्या पेटंट कार्यालयाचे पेटंट जाहीर झाले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती संदर्भातील माहिती गोळा करणे व निर्णय प्रक्रियेसाठी त्याचा उपयोग करणे यासंदर्भातील हे संशोधन आहे.

पेटंट जाहीर झालेल्या संशोधनात प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. त्यात रिमोट सेन्सिंग प्रतिमा जसे हायपरस्पेक्टल, मल्टीस्पेक्टर आणि पेनक्रोमेटिक प्रतिमा यांचे एकत्रीकरण करते. तसेच, क्षेत्रीय कार्यामधून आणि अधिकृत स्त्राेत्र यांच्याकडून संकलित केलेल्या सेकंडरी डेटासह शेतकऱ्यांकडून गोळा केलेल्या माहितीचाही उपयोग यात सामाविष्ट आहे. पिकांचे प्रकार ओळखणे, तसेच त्यांच्यावरती पडलेल्या रोगांची माहिती मिळवणे, माती संदर्भातील माहिती, दुष्काळासंदर्भातील माहिती तयार करणे याविषयी हे संशोधन आहे. जिओ प्रॅक्टिकल टेक्नॉलॉजीचा प्रभावी वापर करून कृषी भूस्थानिक माहिती प्रणालीसाठी एग्रीकल्चर जिओपॅटिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम एका पद्धतीशी संबंधित आहे. ही प्रणाली शासकीय योजना राबवण्यासाठी आवश्यक असलेली निर्णय सहायक माहिती (डिसिजन सपोर्ट इन्फॉर्मेशन) उपलब्ध करून देते, तसेच सर्व अंतिम वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरते.

सर्व प्रकारची माहिती गोळा होणारभूस्थानिक तंत्रज्ञान आणि इन्फॉर्मेटिक्स हे उदयोन्मुख क्षेत्र आहे. विशेषतः पृथ्वी निरीक्षणासाठी निर्माण झालेली वैज्ञानिक आणि व्यापारी उपग्रहांची जाळी तसेच प्रगत भूगोल माहिती प्रणालींनी (जीआयएस) पूरक बनलेले तंत्रज्ञान यात समाविष्ट आहे. ही तंत्रज्ञान वापरणारी क्षेत्रे आणि विभाग वेगाने विकसित होत आहेत. तसेच सध्याचा शोध हा विविध सेंसर डेटाच्या एकत्रीकरणासह योग्य प्रक्रिया टप्प्यांद्वारे पिके, माती व दुष्काळ परिस्थिती विषयक माहिती निर्माण करणाऱ्या प्रणाली व पद्धतीशी संबंधित आहे. प्रणालीबद्ध माहिती प्रवाह आणि एकत्रीकरणामुळे ही प्रणाली कमी मनुष्यबळात व अचूकतेसह ज्ञान संग्रह निर्माण करण्यात कार्यक्षम ठरते. या संशोधनासाठी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्यासह डॉ. राजेश धुमाळ, डॉ. अमोल विभुते, डॉ. अजय नागणे, डॉ. संदीप गायकवाड, डॉ. रूपाली सुसारे, डॉ. धनंजय नलवडे आणि डॉ. महेश सोलकर यांनी योगदान दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Vice-Chancellor Karbhari Kale's Agricultural System Patented: Innovation in Farming

Web Summary : Dr. Karbhari Kale's agricultural geospatial system, using advanced tech for data collection and decision-making, has been patented. It integrates remote sensing images and field data for crop identification, disease detection, soil analysis, and drought information. This system aids government schemes and benefits all users with accurate information.
टॅग्स :scienceविज्ञानAgriculture Sectorशेती क्षेत्रEducation Sectorशिक्षण क्षेत्र