शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
6
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
7
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
8
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
9
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
10
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
11
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
12
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
13
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
14
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
15
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
16
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
17
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
18
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
19
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
20
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल

प्रवाशांचा थरकाप! भीषण वादळ...छत्रपती संभाजीनगरात इंडिगो विमानाचे हवेत हेलकावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:43 IST

शहरावर घिरट्या घालून विमान नाशिककडे रवाना

छत्रपती संभाजीनगर : शहरात बुधवारी सायंकाळी सुटलेल्या वादळात इंडिगोचे दिल्ली-छत्रपती संभाजीनगरविमान सापडले. वादळात विमानाने कधी डाव्या, तर कधी उजव्या बाजूने हेलकावे घेतले. या प्रकाराने प्रवाशांमध्ये हलकल्लोळ उडाला. वादळामुळे विमान चिकलठाणा विमानतळाच्या धावपट्टीवर उतरू शकले नाही. अखेर ते नाशिककडे वळवावे लागले.

इंडिगोचे दिल्ली-छत्रपती संभाजीनगर विमान हे दररोज सायंकाळी ६:२५ वाजता शहरात दाखल होते. सायंकाळी ६:५५ वाजता पुन्हा दिल्लीसाठी रवाना होते. हे विमान बुधवारी नियमित वेळेप्रमाणे सायंकाळी ६:१५ वाजण्याच्या सुमारास शहराच्या हवाई क्षेत्रात दाखल झाले. परंतु, त्याच वेळी शहरात वादळ सुटले होते. अशा परिस्थितीत विमान कधी एका बाजूला, तर कधी दुसऱ्या बाजूने हेलकावे घेत होते. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. विमानाला लँडिंगसाठी परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे वैमानिकाने विमान नाशिकला वळविण्याचा निर्णय घेतला. हे विमान नाशिकला रवाना झाले. हे विमान रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा शहरात दाखल झाले. मोठ्या अपघातातून बचावल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली. या घटनेमुळे दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना उशिरापर्यंत विमानतळावर प्रतीक्षा करावी लागली. याविषयी इंडिगोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

३० प्रवासी परत विमानात बसलेच नाहीतहे विमान नाशिकला गेल्यानंतर ३० ते ३५ प्रवासी तेथेच उतरून गेले. या विमानाने पुन्हा छत्रपती संभाजीनगरला येण्यास त्यांनी नकार दिल्याचे सांगण्यात आले.

जीव मुठीत घेऊन बसलोवादळात विमान कधी एका बाजूने, तर कधी दुसऱ्या बाजूने झुकत होते. आम्ही जीव मुठीत घेऊनच बसलो होतो. खूप थरारक अनुभव आला. अखेर सुखरूपपणे आलो. आम्ही पायलटचे आभार मानले.- गीता आचार्य, विमान प्रवासी

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरairplaneविमान