शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या अपहरणाच्या अफवेने शाळेत पालकांची गर्दी; पोलीसांसह शिक्षक तपासात गुंतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 12:53 IST

सिल्लोड तालुक्यातील पळशी येथील घटना; प्रत्येकजण आपली मुले शाळेत किंवा घरी आहेत का याचा शोध घेत आहे.

सिल्लोड (औरंगाबाद) : तालुक्यातील पळशी येथून एका १० ते १२ वर्षीय मुलाचे एका कार चालकाने अपहरण केल्याची अफवा सिल्लोड तालुक्यात पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलीस पळशी येथे दाखल झाले असून तपास सुरु आहे. दरम्यान, नेमके कोणत्या शाळेतील विद्यार्थ्याचे अपहरण झाले? अपहरण झाले की ही अफवा आहे याची खात्री करण्यासाठी पोलिसांसह, शिक्षक,पालक आणि ग्रामस्थ सर्व दिशेने तपास करत आहेत.

सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास एका खाजगी शाळेत जाणाऱ्या ५ मुलांनी प्रत्यक्ष ही घटना बघितल्याचे समोर आले आहे. त्यांनी सांगितल्यानुसार पळशी गावापासून जवळ असलेल्या एका खाजगी शाळेजवळ चॉकलेटचे आमिष दाखवून चालकाने एका मुलास बोलावले. त्यानंतर त्याच्या तोंडाला कपडा बांधत ओढत कारमध्ये बसवले. त्यावेळी कारमध्ये एक महिला व दोन पुरुष होते. मुलांनी तत्काळ याची माहिती शाळेत येऊन शिक्षकांना दिली. बघताबघता ही वार्ता संपूर्ण गावात पसरली. 

यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या शाळेत गर्दी केली. प्रत्येकजण आपली मुले शाळेत किंवा घरी आहेत का याचा शोध घेत आहे. याची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, उपनिरीक्षक विकास आढे कर्मचाऱ्यांसह पळशीत दाखल झाले आहेत. प्राथमिक माहितीवरून ज्या खाजगी शाळेबाबत माहितीसमोर आली तेथे पोलिसांनी तपास केला. शाळेतील वर्गांची पोलिसांनी हजेरी घेतली असता सर्व विद्यार्थी हजर होते. त्यानंतर पोलीस परिसरातील वस्तीशाळा, खाजगी शाळा, जिल्हा परिषदच्या शाळा तपासत आहेत. मात्र, अद्याप कोणाचे अपहरण झाले हे स्पष्ट झाले नाही.

सीसीटीव्ही तपासले जात आहेतपोलीस सर्व बाजूने तपास करत आहेत. हद्दीत सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे. शिक्षक व पोलीस शाळेत आलेले विद्यार्थी व शाळेत न आलेले विद्यार्थी यांच्या घरी फोन करून खात्री करत आहेत. याशिवाय आस पासचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

तपास सुरु आहे नेमके कुणाचे अपहरण झाले हेच कळत नाही आता ही अफवा आहे की सत्य याचा तपास सुरू आहे. तपासाअंती खरा काय प्रकार आहे ते कळेल..- सीताराम मेहेत्रे,पोलीस निरीक्षक  सिल्लोड ग्रामीण.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रCrime Newsगुन्हेगारी