शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

घरचे लग्न करून देईनात, तो चोरू लागला महिलांची अंतरवस्त्रे; विक्षिप्त तरुणास जमावाने चोपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 20:03 IST

महिला व तरुणींची अंतरवस्त्रे चोरी करणाऱ्या विक्षिप्त तरुणास नागरिकांनी चोप देत दामिनी पथकाच्या स्वाधीन केले.

- मेहमूद शेख

वाळूज महानगर : घरची मंडळी लग्न करीत नसल्याने महिला व तरुणींची अंतरवस्त्रे चोरी करण्याची त्याला सवय लागली. या विक्षिप्त तरुणास शनिवारी नागरिकांनी सिडको महानगरात पकडून बेदम चोप देत दामिनी पथकाच्या स्वाधीन केले.

सिडको वाळूजमहानगर परिसरात घराच्या बाल्कनी व आवारात वाळत घातलेली महिलांची अंतरवस्त्रे गायब होत होती. गत दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. परंतु महिला याची वाच्यता करीत नव्हत्या. परंतु कुटुंबा-कटुुंबातूनही दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. सोसायटीतील नागरिकांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता एक तरुण घरासमोर वाळत घातलेली महिलांची अंतरवस्त्रे रात्री-अपरात्री चोरी करताना टिपला होता. ही अंतरवस्त्रे घेऊन तो ती परिधान करून अश्लील चाळे करीत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्या नंतर नागरिकांनी या अनोळखी तरुणावर पाळत ठेवली होती.

तरुणास धरून जमावाने चोपलेशनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास सिडको वाळूजमहानगरातील सारा वृंदावन सोसायटीसमोर बसलेल्या तरुणांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद हा विक्षिप्त तरुण नजरेस पडला. तरुणांनी त्या विक्षिप्त तरुणास पकडून चोप देण्यास सुरुवात केली. हा गोंधळ पाहून सोसायटीतील महिला व अन्य नागरिकांचा मोठा जमाव जमला. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाच्या पोना. निर्मला निंभोरे, पोकॉ. गिरीजा आंधळे, पोकॉ. सोनाली निकम व ११२च्या पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून त्या विक्षिप्त तरुणास ताब्यात घेतले.

म्हणून लागली सवयअंतरवस्त्रे चोरणारा सचिन सारंगधर दिंडोरे (१९, रा. सिडको वाळूजमहानगर) याची दामिनी पथकाने कसून चौकशी केली. तो बजाजनगरात एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो. घरातील मंडळीना अनेकदा सांगूनही ते माझे लग्न करण्यास टाळाटाळ करीत असल्याने महिलांची अंतरवस्त्रे चोरी करण्याची सवय लागल्याची कबुली त्याने दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी