शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

परभणी-मनमाड दुहेरीकरण थंडबस्त्यात गेल्याने मराठवाड्यावर अन्याय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 19:24 IST

हा मार्ग नजीकच्या काळात होणे आता अशक्य आहे.

ठळक मुद्देपरळी-नगर आणि दौंड-मनमाड रेल्वेमार्गाच्या कामामुळे सर्वेक्षणाचा अहवाल ठेवला बाजूला

औरंगाबाद : परभणी- औरंगाबाद- मनमाड रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचा प्रस्ताव थंडबस्त्यात गेला आहे. परळी- नगर आणि दौंड- मनमाड रेल्वेमार्गाच्या कामामुळे रेल्वे बोर्डाने दुहेरीकरणाच्या सर्वेक्षणाचा अहवाल बाजूला ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे हा मार्ग नजीकच्या काळात होणे आता अशक्य आहे. वर्षानुवर्षे मराठवाड्यावर अन्याय होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. 

परभणी ते मुदखेड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम ५० टक्क्यांवर पूर्ण झालेले आहे. उर्वरित काम मार्च, एप्रिल-२०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. परभणी ते मुदखेड दुहेरीकरण मार्गी लागल्याने अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या परभणी-मनमाड मार्गाचेही दुहेरीकरण होईल, अशी अपेक्षा मराठवाड्यातून व्यक्त होत होती. दक्षिण मध्य रेल्वेकडून परभणी- औरंगाबाद- मनमाड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रस्तावदेखील रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. 

या प्रस्तावाला कधी मंजुरी मिळते, याकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागलेले असताना सध्यातरी त्याला रेल्वे बोर्डाकडून प्राधान्य नसल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे. स्वानंद सोळंके यांनी माहितीच्या अधिकारात मनमाड- औरंगाबाद- परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या परिस्थितीची विचारणा केली. यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडून बुधवारी माहिती देण्यात आली. परभणी- औरंगाबाद- मनमाड हा २९१ कि.मी.चा मार्ग आहे. यासाठी २,१९९.४१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे; परंतु सध्या मराठवाड्यात परळी- नगर आणि दौंड- मनमाड या रेल्वेमार्गाचे काम सुरू आहे. हे काम सुरू असल्यामुळे सर्वेक्षण झालेल्या परभणी- मनमाड या मार्गाच्या दुहेरीकरणाचा सध्या कोणताही विचार नसल्याचे बोर्डाने म्हटले आहे. बोर्डाच्या माहितीनुसार यंदाच्या अर्थसंकल्पातही दुहेरीकरणाला हिरवा कंदिल मिळणार नाही.

महाव्यवस्थापक म्हणाले होते...औरंगाबाद दौऱ्यात १२ डिसेंबर २०१८ रोजी तत्कालीन दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव म्हणाले होते, दुहेरीकरणाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठविलेला आहे. आगामी अर्थसंकल्पात मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. मंजुरी मिळाल्यानंतर प्लॅन तयार करून तीन वर्षांत दुहेरीकरण होईल. मंजुरी मिळाल्यानंतर नियोजन केले जाईल, असे ते म्हणाले होते. त्यामुळे मंजुरी कधी मिळणार आणि नियोजन कधी होणार, हा प्रश्न आहे.

मुख्यमंत्री काही बोलत नाहीतमुदखेड- परभणी या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम आधीच लांबणीवर पडले आहे. त्यात आता मनमाड- परभणी दुहेरीकरणही २०२२ पर्यंत अशक्य दिसते. मराठवाड्यातील रेल्वेमार्गासंदर्भात नुसती बनवाबनवी सुरू आहे; परंतु मुख्यमंत्री काहीही बोलत नाहीत. दुहेरीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे.-ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती

प्रवाशांची सतत गैरसोयएकेरी रुळावरून क्षमतेपेक्षा अधिक रेल्वे सध्या धावत आहेत. त्याची रेल्वे प्रशासनाला कल्पना आहे. तरीही दुहेरीकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. फक्त कोट्यवधींचे उत्पन्न घेण्यावरच भर दिला जात आहे. दुहेरीकरणाअभावी प्रवाशांना सतत गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे.-संतोषकुमार सोमाणी, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी सेना

टॅग्स :railwayरेल्वेMarathwadaमराठवाडाpassengerप्रवासी