शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘आमचं ठरलंय’ भूमिकेमुळे पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 14:37 IST

राज्याचे नेतृत्व करण्याची संधी इतर पक्षांत मिळण्याची शक्यता कमी असल्याची कार्यकर्त्यांची भावना

ठळक मुद्देमुंबईत भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी पंकजा मुंडे यांची भेट घेतली.जवळच्या कार्यकर्ते आणि नेत्यांशी संवाद साधला असता पंकजा या पक्षांतर करणार नसल्याचे स्पष्ट केले. 

औरंगाबाद : राज्यातील भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी ‘आमचं ठरलंय’ या नावाखाली सोशल मीडियामध्ये सुरु केलेल्या मोहिमेमुळे मुंडेसमर्थक कार्यक़र्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र पंकजा मुंडे यांचे काही ठरले नसून त्या पक्षातच राहतील असा विश्वास त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी व्यकत केला. 

मुंबईत भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. यामुळे गोपीनाथ गडावर गुरुवारी (दि. १२) होणाऱ्या मेळाव्यात त्या कोणती भूमिका घेणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, मुंडे यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना काही संदेश आहे का, याचा कानोसा घेतला असता काही कार्यकर्त्यांनी त्या पक्षांतर करणार नाहीत, असा असा ठाम विश्वास व्यक्त केला.पंकजा मुंडे यांच्या सोशल मीडियावरील पोस्टनंतर राजकारण ढवळून निघाले आहे. याचदरम्यान पंकजा मुंडे यांनीही पक्षांतर करणे रक्तात नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतरही एकनाथ खडसे यांच्यासह इतर ओबीसी नेत्यांच्या चाललेल्या बैठका, संवाद यामुळे पंकजा मुंडे या एकनाथ खडसे यांच्यासह पक्षांतर करण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. याविषयी औरंगाबाद आणि बीडमधील त्यांच्या जवळच्या कार्यकर्ते आणि नेत्यांशी संवाद साधला असता पंकजा या पक्षांतर करणार नसल्याचे स्पष्ट केले. 

औरंगाबादमधील एका समर्थकाने सांगितले की, सोशल मीडियावरील मोहिमेमुळे आम्हीही संभ्रमात आहोत. मात्र, पंकजा मुंडे पक्ष बदलाचा निर्णय घेतील, असे वाटत नाही. पक्षाचे एक नेते म्हणाले की, आमचा दुसरा तिसरा काही विचार नाही. पक्षात राहायचं असंच आमचं ठरलंय. 

पंकजांकडून दबाव टाकण्याचे राजकारण ?बीडमधील त्यांच्या जवळचे एक़ नेते म्हणाले, पंकजा मुंडे यांना राज्याचे नेतृत्व करण्याची महत्त्वाकांक्षा आहे. शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांच्याकडे नेतृत्व दिले जाणार नाही.  आ. आदित्य ठाकरे यांच्यामुळे भविष्यातही संधी मिळण्याची शक्यता धूसर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही नेतृत्वासाठी स्पर्धा निर्माण झालेली आहे. त्याचवेळी काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये पंकजा मुंडे एकरूप होण्याची शक्यता नाही. त्यामुळे भाजपशिवाय पंकजा मुंडे यांना पर्याय नसल्याचे त्यांच्या समर्थकांनी स्पष्ट केले. यामुळे पंकजा मुंडे पक्षांतर नव्हे, तर दबाव गटाचे राजकारण करीत असल्याचे स्पष्ट होत आहे.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाAurangabadऔरंगाबादPoliticsराजकारणBeedबीड