शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

मॅरेथॉन बैठकांमध्ये अधिकाºयांचे पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:11 IST

जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या पंचायतराज समितीच्या वेगवेगळ्या पथकांनीे गुरुवारी नऊही पंचायत समित्यांना भेटी देऊन मॅरेथॉन बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये आर्थिक व्यवहारांमधील अनियमितता आणि निकृष्ट दर्जाच्या कामांवरुन अधिकाºयांची चांगलीच खरडपट्टी काढण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या पंचायतराज समितीच्या वेगवेगळ्या पथकांनीे गुरुवारी नऊही पंचायत समित्यांना भेटी देऊन मॅरेथॉन बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये आर्थिक व्यवहारांमधील अनियमितता आणि निकृष्ट दर्जाच्या कामांवरुन अधिकाºयांची चांगलीच खरडपट्टी काढण्यात आली. समितीच्या सदस्यांचा रुद्रावतार पाहता काही अधिकाºयांवर कारवाईची टांगती तलवार लटकल्याचे दिसून आले.महाराष्ट्र विधानमंडळाची पंचायतराज समिती बुधवारपासून जिल्ह्याच्या दौºयावर आली आहे. बुधवारी या समितीने जिल्हा कचेरीत २००८-०९ व २०११-१२ या आर्थिक वर्षातील लेखापरिक्षण अहवालातील त्रुटींबाबत आढावा बैठक घेतल्यानंतर गुरुवारी समितीने ग्रामीण भागाचा दौरा केला. समितीच्या प्रत्येक तालुक्यासाठीच्या स्वतंत्र टीम तयार करण्यात आल्या होत्या. त्यानुसार सेलू पंचायत समितीला दुपारी १२ वाजेच्या सुमारास एका पथकाने भेट दिली. प्रारंभी सत्कार समारंभ झाल्यानंतर नूतन महाविद्यालयाच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यात करण्यात आलेल्या सिंचन विहिरींचा प्रश्न प्रामुख्याने चर्चेला आला. सिंचन विहिरींना मंजुरी देण्यात झालेल्या अनियमिततेबाबत समितीच्या सदस्यांनी अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. तत्कालीन गटविकास अधिकारी चंद्रमुनी मोडक यांच्या कार्यकाळात झालेल्या अनियमिततेप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. तसे संकेत सदस्यांनी या बैठकीत दिले. येथील कामकाजाचा आढावा घेऊन समितीच्या सदस्यांनी रवळगावला भेट दिली. येथील पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर कुंडी व मोरेगाव येथील बंधारा तसेच जीवाजी जवळा येथील वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामासंदर्भात झालेल्या तक्रारीवरुन पाहणी केली. यावेळी येथील ग्रामस्थांनी आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. त्यानंतर ही समिती परभणीकडे परतली. या समितीत आ.आर.टी.देशमुख, आ.सुधाकर भालेराव, आ.दत्तात्रय सावंत, आ.श्रीकांत देशपांडे आदींचा समावेश होता.सोनपेठमध्ये दोन तास आढावा बैठकसोनपेठ येथे दुपारी २ वाजेच्या सुमारास समितीचे सदस्य दाखल झाले. या सदस्यांनी पंचायत समितीच्या सभागृहात जवळपास २ तास अधिकाºयांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत कामकाजातील अनियमिततेवरुन गटविकास अधिकाºयांसह अन्य अधिकाºयांची खरडपट्टी काढण्यात आली. त्यानंतर समितीने जि.प.शाळेला भेट देऊन इमारतीची पाहणी केली. त्यानंतर ही समिती गंगाखेडकडे रवाना झाली. समितीत आ.भरत गोगावले, आ.रणधीर सावरकर, आ.सुधाकर कोहळे, ह.नी.तामोरे आदींची उपस्थिती होती. जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, दशरथ पाटील आदींनी सदस्यांचा सत्कार केला.पूर्णेत बीडीओंची तक्रारपूर्णा तालुक्यात सकाळी १० वाजेच्या सुमारास आ.विक्रम काळे, आ.अमर राजूरकर, आ.शशिकांत साखरकर आदींची समिती दाखल झाली. एरंडेश्वर येथे समितीचे आगमन झाल्यानंतर समितीने जि.प. शाळा, आरोग्य उपकेंद्र, अंगणवाडी व ग्रामपंचायतीला भेट देऊन पाहणी केली. तसेच ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकूण घेतल्या. त्यानंतर पूर्णेकडे येताना लक्ष्मीनगर ते पूर्णा या नवीन रस्ता कामाची पाहणी केली. दुपारी २ वाजता पूर्णा येथे समितीचे आगमन झाले. प्रारंभी ग्रामीण रुग्णालयास भेट देण्यात आली. त्यानंतर पं.स.ला भेट देऊन अधिकाºयांशी चर्चा करण्यात आली. यावेळी जि.प.सदस्य इंदुबाई अंबोरे, सभापती उर्मिला बनसोडे, श्रीनिवास मुंडे, श्रीनिवास जोगदंड आदींनी गटविकास अधिकारी व्ही.यू.सुरवसे यांची तक्रार करुन त्यांच्या निलंबनाची मागणी केली.