शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

फुलंब्रीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत पंचायत समिती लिपिक ठार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 17:37 IST

फुलंब्री जवळ निल्लोड फाट्याजवळ झालेल्या दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.

औरंगाबाद : फुलंब्री जवळ निल्लोड फाट्यावर झालेल्या दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. सुरेश बाबुराव कुदळ ( 45 ,रा. रजाळवाडी ता. सिल्लोड ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे असून अपघातात एकजण गंभीर जखमी आहे. 

सुरेश कुदळ हे फुलंब्री पंचायत समितीत लिपिक पदावर कार्य करायचे. शुक्रवारी ते कार्यालयातून आपल्या दुचाकीवरून (क्र. एम एच 20 डीआर 5669) सिल्लोड कडे परतत होते. औरंगाबाद, जळगाव राज्य मार्गावरील निल्लोड फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यामध्ये कुदळ व रमेश सदाशिव कड हे दोघे गंभीर जखमी झाले. 

अपघाताची माहिती मिळताच नागरिक व पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारा दरम्यान कुदळ यांचा मृत्यू झाला. या घटनेची वडोदबाजार पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक नारायण घुगे, पो.काॅ. संतोष डोंगरे पुढील तपास करीत आहे. 

सुरेश कुदळ हे फुलंब्री पंचायत समितीत साधारणपणे पाच वर्षापासून कार्यरत होते. त्यांनी काही काळ आस्थापना विभागातही काम केले . त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे ते सर्वांना परिचित होते. त्यांच्या अकस्मीक निधनाने रजाळवाडीसह फुलंब्री पंचायत समितीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद