शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या कचर्‍यावर मुंबईतील बैठकीत पुन्हा पंचसूत्रीचे चिंतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 11:51 IST

शहरातील कचर्‍याच्या विल्हेवाटीप्रकरणी चिंतन बैठका सुरूच असून, यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली.

ठळक मुद्दे शहरातील कचर्‍याचा प्रश्न पंचसूत्री कार्यक्रमानुसार  मार्गी लावण्याचे आदेश मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी बुधवारी दिले. ९ मार्च रोजी घोषित केलेल्या पंचसूत्रीच्या आधारावरच कचर्‍याची विल्हेवाट लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या. बैठकीला नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आदींची उपस्थिती होती.

औरंगाबाद : शहरातील कचर्‍याचा प्रश्न पंचसूत्री कार्यक्रमानुसार  मार्गी लावण्याचे आदेश मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी बुधवारी दिले. ९ मार्च रोजी घोषित केलेल्या पंचसूत्रीच्या आधारावरच कचर्‍याची विल्हेवाट लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या. शहरातील कचर्‍याच्या विल्हेवाटीप्रकरणी चिंतन बैठका सुरूच असून, यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली. बैठकीला नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आदींची उपस्थिती होती.

कचरा समस्येबाबत लवकर मार्ग काढण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. त्या अनुंषगाने म्हैसकर यांनी औरंगाबादमध्ये येऊन प्रश्न सोडविण्यासाठी पंचसूत्री तयार केली. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना वेळावेळी राज्य शासनामार्फत मार्गदर्शन करण्यात येत असून, शहरातील ९ विभागांसाठी ९ पथके तयार करण्यात आली आहेत. त्या माध्यमातून झोनमध्येच कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात येत आहे. इंदौर येथे काम करणार्‍या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची मदत कचर्‍याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी घेण्यात येत असल्याचे म्हैसकर यांनी बैठकीत सांगितले. तर सध्या काही ठिकाणी कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी खत खड्डे तयार करण्याचे कामकाज सुरू असल्याचे  नवल किशोर राम यांनी सांगितले.

मुख्य सचिवांचे आदेश असेकचर्‍याचे वर्गीकरण करून त्यानुसारच कचर्‍याची विल्हेवाट लावणे, कचर्‍यावर विकेंद्रित पद्धतीने प्रक्रिया करणे, ओल्या कचर्‍यापासून खत निर्माण करणे, सुका कचरा जमा करण्यासाठी प्रत्येक प्रभागात केंद्र सुरू करणे, यापुढे कचर्‍याचे कुठेही डम्पिंग होणार नाही, याची काळजी घेऊन त्या पंचसूत्रीनुसार औरंगाबादमधील कचर्‍याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश मुख्य सचिवांनी दिले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नNaregaon Garbage Depoनारेगाव कचरा डेपोAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाNavalkishor Ramनवलकिशोर रामState Governmentराज्य सरकारcollectorजिल्हाधिकारी