शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

‘पाकिस्तानला धडा शिकवायची गरज होती’; ‘ऑपरेशन सिंदूर’वर इम्तियाज जलीलांची ठाम भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 15:02 IST

“सातत्याने दहशतवादी देशात घुसखोरी करतात. आपण का हे सहन करायचे?”

छत्रपती संभाजीनगर: काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ हवाई कारवाईवर देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील आपली परखड भूमिका मांडली आहे.

माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले, “सामान्य माणसांचे, पर्यटकांचे प्राण दहशतवाद्यांनी घेतले. यामुळे सर्व भारतीयांच्या मनात पाकिस्तानला एकदा धडा शिकवला पाहिजे असेच होते. ते भारतीय सैन्य दलांनी करून दाखवले आहे.” 

“सातत्याने दहशतवादी देशात घुसखोरी करतात. आपण का हे सहन करायचे?” असा सवाल करून माजी खासदार इम्तियाज जलील यांनी “पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या सर्व ठिकाणी हल्ला करा.” अशी मागणी केली आहे. पाकिस्तानला कठोर शब्दासोबत कृतीतून उत्तर दिले पाहिजे, अशी सर्व भारतीयांची भावना होती. आता यापुढे अशा स्ट्राइक आणखी किती दिवस चालतील माहिती नाही, पण 'ऑपरेशन सिंदूर'चे आम्ही स्वागत करतो. भारतीय सैन्यदलाचे अभिनंदन. असेही जलील म्हणाले. 

या कारवाईमुळे देशभरात दहशतवादाविरोधात एकजूट दिसून आली आहे. राजकीय भिन्नता असूनही, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर अनेक नेते एकत्र आले आहेत. अशा वेळी इतर देश बघ्याची भूमिका घेतात. ते अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने याकडे पाहतात. आपली अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. युद्ध होतात तेव्हा याचे परिणाम आर्थिक बाबीवर होतात. अर्थ व्यवस्था आपण नंतरही उभी करू. भारताने स्वरक्षणार्थ दहशतवादी ठिकाणावर हल्ला केला आहे, पाकिस्तानला असा धडा शिकवला गेलाच पाहिजे, अशी ठाम भूमिका माजी खासदार जलील यांनी मांडली.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाImtiaz Jalilइम्तियाज जलीलchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर