शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ षष्ठी २०२६: तुकाराम बीजेला सुरू झालेला विधी पूर्ण; आंध्र प्रदेशातील भाविकाच्या घागरीने भरला नाथांचा रांजण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 16:48 IST

पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या वाड्यातील पवित्र 'रांजण' भरला; 'श्रीखंड्या'च्या रूपातील सेवेची परंपरा आजही कायम

पैठण (जि. छत्रपती संभाजीनगर): संतपरंपरेचा तेजस्वी वारसा लाभलेल्या पैठण नगरीत संत एकनाथ महाराज षष्ठी सोहळ्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या सोहळ्याची अत्यंत भावस्पर्शी परंपरा समजला जाणारा नाथवाड्यातील 'पवित्र रांजण' शनिवारी (७ मार्च) सकाळी भक्तिमय वातावरणात भरला. भगवान श्रीकृष्णाने 'श्रीखंड्या' या रूपात नाथांची १२ वर्षे सेवा केली होती, याच श्रद्धेचे स्मरण या विधीद्वारे दरवर्षी केले जाते.

तुकाराम बीजेपासून विधीला प्रारंभया पवित्र परंपरेला तुकाराम बीजेच्या दिवशी प्रारंभ करण्यात आला होता. पुरोहित चंद्रशेखर उपाध्ये व रवींद्र साळ जोशी यांच्या मंत्रोच्चारात आणि नाथवंशज हभप रघुनाथ बुवा गोसावी पालखीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली हा विधी पार पडला. शनिवारी सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी संतोष विठ्ठलराव कुलकर्णी (मदनुर, जि. कामारेठी, आंध्र प्रदेश) यांच्या घागरीने हा रांजण पूर्ण भरला. यावेळी संतोष कुलकर्णी यांना 'श्रीखंड्या' मानून त्यांचे पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले.

अशी आहे आख्यायिकावारकरी संप्रदायानुसार, पांडुरंगाने नाथांच्या सेवेसाठी पैठणमध्ये ३६ वर्षे वास्तव्य केले होते. त्यातील शेवटची १२ वर्षे त्यांनी 'श्रीखंड्या' या नावाने गोदावरीचे पाणी आणून रांजण भरण्याची सेवा केली होती. आजही हा रांजण भरताना तोच भक्तीचा ओलावा अनुभवायला मिळतो. या प्रसंगी रवींद्र पांडव, ज्ञानेश पालखीवाले, योगेश पालखीवाले यांच्यासह मोठ्या संख्येने वारकरी भाविक उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Eknath Shashti 2026: Ritual Completes; Andhra Devotee Fills Nath's Pot

Web Summary : Paithan's Eknath Shashti celebrated with devotion. The sacred 'Ranjan' filled, continuing tradition honoring Lord Krishna's service as 'Shrikhandya'. The ritual, started on Tukaram Beej, concluded with a devotee from Andhra Pradesh filling the pot, symbolizing unwavering faith and devotion.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर