शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीतून पैठण तालुक्याला वगळले; पालकमंत्री संदीपान भुमरे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 14:17 IST

पैठण तालुक्यासोबत वैजापूरला देखील वगळले; दुसऱ्या टप्प्यात मदत मिळणार असल्याचा शासनाचा दावा 

औरंगाबाद : सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सुमारे २ लाख ८६ हजार शेतकऱ्यांच्या १ लाख ९२ हजार ९५४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यांच्या भरपाईसाठी २६८ कोटी रुपयांची मदत शासनाने जाहीर केली असून, यात पैठण, वैजापूर तालुका व अप्पर तहसीलअंतर्गत येणाऱ्या नुकसानीचा समावेश नाही. या तालुक्यात सततच्या पावसामुळे नुकसान झाले असून, १५० कोटींहून अधिकचा मदतनिधी या तालुक्यांना जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकऱ्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीत तालुक्यांचा समावेश नसल्यामुळे नाराजीचा सूर उमटत आहे.

गेल्या आठवड्यात जिल्हा प्रशासनाने २६८ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्याबाबत तालुकानिहाय आदेश दिले आहेत. त्यामध्ये औरंगाबाद तालुक्यात ११ कोटी, फुलंब्रीत १२ कोटी, गंगापूर ५३ कोटी, खुलताबाद २१ कोटी, कन्नड ६३ कोटी, सिल्लोड ५५ कोटी, सोयगाव ४९ कोटी असा २६८ कोटींचा मदतनिधी वितरित करण्यात येणार आहे. दरम्यान, अन्नदाता शेतकरी संघटनेचे जयाजी सूर्यवंशी यांनी सांगितले की, पैठण तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित राहिले आहेत. शेतकऱ्यांना मदत न करणे, विद्युतपंप बंद करणे हे ४ डिसेंबरपर्यंत थांबविले नाही तर जलसमाधी घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

पालकमंत्री काय म्हणालेअतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे नुकसानीचे दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात अतिवृष्टीचे नुकसान झालेल्या शेतकरी व क्षेत्रासाठी मदत देण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे पैठण, वैजापूर व अप्पर तहसीलअंतर्गत मदत जाहीर होणारच आहे. पैठण तालुक्यात ९५ कोटी मिळण्याची शक्यता आहे; तसेच वैजापूर व अप्पर तहसीलमध्येही मदत जाहीर होणार आहे. उगाच कुठल्याही गोष्टीचे राजकारण करण्यात काहीही अर्थ नाही.- संदीपान भुमरे, पालकमंत्री

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊस