- अनिलकुमार मेहेत्रेपैठण (छत्रपती संभाजीनगर): संतांची भूमी आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पैठण नगरीत ५ मार्चपासून सुरू होणाऱ्या संत एकनाथ महाराज षष्ठी सोहळ्याची लगबग सुरू झाली आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी गोदावरी नदीचे पात्र रिकामे करण्यात आले असून, सध्या उघड्या पडलेल्या वाळवंटात नाणी शोधण्यासाठी कष्टकऱ्यांची मोठी झुंबड पाहायला मिळत आहे.
पाणी ओसरले आणि दिंड्यांची तयारी सुरूजायकवाडी धरणाच्या 'हायड्रो' प्रकल्पातून सोडलेले पाणी बंधाऱ्याचे दरवाजे उघडून पुढे सोडण्यात आले आहे. नाथषष्ठीसाठी राज्यभरातून लाखो वारकरी आणि शेकडो दिंड्या पैठणमध्ये दाखल होतात. नदीकाठच्या विस्तीर्ण वाळवंटात या दिंड्यांचे मुक्कामी फड उभारले जात असल्याने पात्रातील पाणी कमी करण्यात आले आहे.
श्रद्धेच्या नाण्यांतून उदरनिर्वाहगोदावरीच्या पात्रात दशक्रिया विधी किंवा अस्थिविसर्जनासाठी येणारे भाविक श्रद्धेपोटी नाणी, वस्त्रे आणि कधीकधी सोन्याचे मणी अर्पण करतात. आता पाणी ओसरल्यामुळे ही नाणी शोधण्यासाठी अनेक गरीब कुटुंबे, महिला आणि लहान मुले नदीपात्रात उतरली आहेत. विशेषतः गणेश घाटाजवळील खोलगट भागात दिवसभर ही शोधमोहीम सुरू असते. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह यातून मिळणाऱ्या साहित्यावरच अवलंबून असल्याचे वास्तव समोर आले आहे.
स्वच्छता अभियानातून 'भक्तीचा' संदेशयात्रेपूर्वी घाटांची स्वच्छता करण्यासाठी नगर परिषद आणि विविध संस्था सरसावल्या आहेत. रविवारी संत निरंकारी मिशनच्या वतीने गोदावरी घाट परिसरात मोठे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. स्वयंसेवकांनी कचरा वेचून भाविकांना स्वच्छतेचे आवाहन केले. श्रद्धा, परंपरा आणि उदरनिर्वाह यांचा एक अनोखा संगम सध्या पैठणच्या गोदावरीकाठी पाहायला मिळत आहे.
Web Summary : As the Godavari River recedes for the Nath Shashti festival in Paithan, hundreds search the riverbed for coins offered by devotees, seeking a livelihood. The cleaning drive conveys a message of devotion.
Web Summary : पैठण में नाथ षष्ठी उत्सव के लिए गोदावरी नदी के कम होने पर, सैकड़ों भक्त सिक्कों की तलाश में नदी तल छान रहे हैं, जो श्रद्धालुओं द्वारा अर्पित किए जाते हैं। सफाई अभियान भक्ति का संदेश देता है।