शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नाथषष्ठी २०२६: पैठणमध्ये लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तीचा जागर; टाळ-मृदंगाचा गजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 18:38 IST

नाथांच्या नगरीत घुमला विठूनामाचा गजर! शेकडो दिंड्यांच्या प्रमुखांचा गौरव; नाथषष्ठी सोहळ्याचा उत्साह शिगेला

पैठण : संतांची भूमी आणि दक्षिण काशी म्हणून ओळख असलेली पैठण नगरी नाथषष्ठी सोहळ्यामुळे भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या या सोहळ्यासाठी राज्यासह देशाच्या विविध भागांतून लाखो वारकरी पैठणमध्ये दाखल झाले असून, नाथांच्या नगरीत अभंग, टाळ-मृदंग आणि हरिनामाच्या गजराने वातावरण दुमदुमून गेले आहे.

सोमवारी संत एकनाथ महाराज मंदिरात पारंपरिक पद्धतीने शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर सायंकाळी शेकडो दिंड्यांनी वारकऱ्यांसह पैठण नगरीची प्रदक्षिणा घालत भक्तीची अनोखी परंपरा जपली. संतांच्या विचारांचा जागर आणि वारकरी संप्रदायाची एकजूट यामुळे संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. मंगळवारी संत एकनाथ महाराज मंदिर संस्थानच्या वतीने गोदावरीच्या वाळवंटात विसावलेल्या विविध दिंड्यांच्या पाड्यांवर जाऊन दिंडी प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार विलास भुमरे यांनी वारकऱ्यांच्या भेटी घेत स्वागत केले आणि दिंडी प्रमुखांचा गौरव केला.

याप्रसंगी नगराध्यक्ष विद्या भूषण कावसानकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, संस्थानचे कार्यकारी विश्वस्त बाजीराव केशवराव बारे, विश्वस्त तथा अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकुने, विश्वस्त प्रा. डॉ. गणेश मोहिते, हभप. विठ्ठल चनघटे महाराज, विश्वस्त राघोबा शाखा तसेच नाथ वंशज हभप रघुनाथ बुवा महाराज गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, उपमुख्याधिकारी सोमनाथ गरजे यांनी शहरातील विविध ठिकाणी भेटी देत वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांची पाहणी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Paithan Eknath Shashti 2026: Devotion Resounds with Lakhs of Warkaris

Web Summary : Paithan's Nath Shashti 2026 sees lakhs of Warkaris immersed in devotion. The air resonates with chants and traditional music as devotees gather, continuing the age-old tradition with prayers and community feasts. The city welcomes all with open arms.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर