शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

MPSCला ब्रेक, राजकारणात 'टॉप रॅंक'; पैठणमध्ये शिक्षकाची २२ वर्षीय लेक बनली नगरसेविका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 18:47 IST

अधिकारी व्हायचं स्वप्न होतं, पण जनतेने आधीच 'नेते' केलं! पैठणच्या स्नेहलचा झंझावात

पैठण: "राजकारणात येऊनही समाजसेवा करता येते आणि शहराचा कायापालट करता येतो," हा विश्वास उराशी बाळगून पैठणच्या २२ वर्षांच्या स्नेहल धुपे यांनी नगरसेवक पदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. बी. फार्मचे शिक्षण पूर्ण करून एमपीएससीची तयारी करणाऱ्या या तरुणीने राजकारणात घेतलेली ही उडी सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

शिक्षकाच्या लेकीस भावाचं प्रोत्साहन स्नेहल या एका शिक्षकाची मुलगी आहे. छत्रपती संभाजीनगरातून बी. फार्मचे उच्चशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी एमपीएससीची तयारी करत होत्या. मात्र, आपल्या भागातील समस्या सोडवण्यासाठी आणि लोकांसाठी काहीतरी करण्यासाठी त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या भावाने खंबीर साथ दिली आणि त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी प्रोत्साहित केले.

स्वच्छ पैठणचा संकल्प "केवळ तक्रारी करण्यापेक्षा व्यवस्थेत बदल घडवण्यासाठी त्यात उतरणे गरजेचे आहे," असे स्नेहल यांचे मत आहे. निवडून आल्यानंतर त्यांनी शहर स्वच्छतेस आपले पहिले प्राधान्य असल्याचे जाहीर केले आहे. अभ्यासाच्या शिस्तीमुळे स्नेहल यांनी निवडणुकीच्या काळातही नियोजनबद्ध प्रचार केला आणि मतदारांचे मन जिंकले. त्यामुळे त्यांचा विजय साकार झाला. 

बदलासाठी तरुणांनी राजकारणात यावे वयाच्या ज्या वर्षी अनेक तरुण आपल्या करिअरची दिशा शोधत असतात, त्याच वयात स्नेहल यांनी लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या या यशामुळे पैठणमधील तरुणाईत आनंदाचे वातावरण असून, सुशिक्षित तरुणांनी राजकारणात येण्यासाठी हे एक उत्तम उदाहरण मानले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : MPSC Break, Politics Top Rank: Teacher's Daughter Becomes Paithan Corporator

Web Summary : Snehal Dhupe, a 22-year-old teacher's daughter and MPSC aspirant, won Paithan's corporator election. Encouraged by her brother, she aims to serve the community and transform the city, prioritizing cleanliness. Her success inspires educated youth to enter politics.
टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Maharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२५chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर