शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

पैठण शहरास सलग दोन दिवस गूढ आवाजाचे हादरे; प्रशासनाने मौन बाळगल्याने नागरिक भयभीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 19:48 IST

ढ आवाजाचा हादरा व तीव्रतेत सातत्याने वाढ  होत असल्याने नागरिकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पैठण: शहरात मंगळवारी ( दि ११) रोजीच्या गूढ आवाजाने बसलेल्या हादऱ्याची चर्चा ओसरत नाही तोच शुक्रवार व शनिवार असे सलग दोन दिवस पुन्हा गूढ आवाजाच्या दणक्याने शहर हादरले. विशेष म्हणजे, भूगर्भातून येणाऱ्या या गूढ आवाजाची तीव्रता शहराच्या दक्षिण भागास जास्त जाणवते असे अनुभवास आले आहे. गूढ आवाजाबाबत प्रशासनाने मौन धारण केल्याने जनतेच्या मनात भितीने घर केले आहे. प्रशासनाने या गूढ आवाजा बाबत खुलासा करावा अशी मागणी होत आहे. 

पैठण शहर मंगळवारी दुपारी १.४७ वा जोरदार गुढ आवाजाने हादरले, यानंतर दि १४ रोजी सायंकाळी ६.०२ वा पुन्हा गूढ आवाजाचा दणका बसला. शनिवारी ४.१६ वा परत शक्तीशाली आवाजाचा दणका बसला. गूढ आवाजाच्या दणक्याने नागरीक भयभीत झाले आहेत. या अगोदर बसलेल्या भूगर्भातील गूढ आवाजाची नोंद जायकवाडी धरणावरील भूकंपमापण यंत्रावर झालेली नाही परंतु सध्या जायकवाडी धरणावरील भूकंपमापण यंत्र बंद असल्याने गेल्या पाच दिवसात झालेले गूढ आवाज व भूगर्भातील हालचालीची नोंद होणार नसल्याने सगळेच रामभरोसे सुरू आहे. सततच्या गूढ आवाजाने नागरीकांची भितीने गाळण उडालेली आहे. 

आठ वर्षात ३५ गुढ आवाजाचे दणकेगेल्या ८ वर्षात आजचा ३५ वा गुढ आवाज होता. दरम्यान गूढ आवाजाचा हादरा व तीव्रतेत सातत्याने वाढ  होत असल्याने नागरिकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भुगर्भशास्त्रज्ञांनी गूढ आवाजाचा व भूगर्भातील हालचालीचा काही संबंध नाही असा अहवाल दिलेला आहे. शास्रज्ञांच्या म्हणण्यानुसार गूढ आवाज भूगर्भातील नाही हे मानले तर भूपृष्ठावर हा आवाज कोण कसा करतो याचाही तपास होणे गरजेचे आहे. परंतु, वारंवार असे धक्के बसत असताना जिल्हा प्रशासन मात्र  मौन बाळगून आहे प्रशासनाकडून कसलाच खुलासा होत नसल्याने या आवाजाचे गूढ दिवसोंदिवस वाढतच चालले आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरण