शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पैठण आणि पैठणीचा दिल्लीत सन्मान; मंगल पगारे यांचा ‘उत्कृष्ट विणकर’ पुरस्काराने गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 16:05 IST

पैठण येथील विणकर मंगल रवींद्र पगारे यांचा ‘उत्कृष्ट विणकर’ पुरस्काराने नवी दिल्ली येथे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह आणि राज्यमंत्री पबित्र मार्धेरीटा यांनी गौरव केला.

- दादासाहेब गलांडेपैठण: आपल्या मेहनतीने आणि कौशल्याने पैठणी विणकामाच्या परंपरेला नवा आयाम देणाऱ्या पैठण येथील विणकर मंगल रवींद्र पगारे यांचा गुरुवारी राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह आणि राज्यमंत्री पबित्र मार्धेरीटा यांच्या हस्ते ‘उत्कृष्ट विणकर’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.

पैठण शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील मंगल रवींद्र पगारे यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले असून त्यांच्या घरची परिस्थिती बिकट होती, परिवाराचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्या पूर्वी शेतात रोजंदारीचे काम करीत असत; पण त्यांनी जिद्दीने पैठणी विणण्याची कला सात वर्षांपूर्वी आत्मसात केली आणि मेहनतीने नवा मार्ग निवडला. आज त्या घरूनच वीस हजार ते एक लाख रुपये किमतीच्या पैठणी तयार करून ग्राहकांना विकतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त दिल्ली येथे गुरुवारी केंद्र शासनाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांचा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते ‘उत्कृष्ट विणकर’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

राष्ट्रीय स्तरावर पैठणचा पुन्हा गौरवयापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ जुलै रोजी ‘मन की बात’ या कार्यक्रमात पैठण येथील कविता अरुण ढवळे या विणकर महिलेच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या संघर्षमय प्रवासाचे कौतुक केले होते. आता मंगल रवींद्र पगारे यांच्या निमित्तानेही पुन्हा एकदा पैठणचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे.

हक्काची बाजारपेठ द्यावीमाणसाच्या मनात जिद्द असेल तर काहीच अवघड नाही. या निमित्ताने केवळ माझा नव्हे, तर पैठण व महाराष्ट्रातील सर्व विणकर समाजाचा गौरव झाला आहे. शासनाकडून एकच अपेक्षा आहे, पैठणीला हक्काची बाजारपेठ आणि नवीन कारागीर निर्माण करण्यासाठी सरकारने धोरण राबवावे.-मंगल रवींद्र पगारे, विणकर, पैठण

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरNew Delhiनवी दिल्ली