शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

‘माझे शिकण्याचे प्रयोग’द्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 18:10 IST

शाळेतील विद्यार्थ्यांना अधिक तंत्रस्नेही बनविण्यासाठी शाळा डिजिटल करण्याचा ध्यास

ठळक मुद्देपरसबागेची निर्मिती, वाचनकट्टा, ई-लर्निंगमधून शिक्षण‘माझे प्रेरणादायी आदर्श’ याद्वारे वैज्ञानिक आणि थोर तत्त्ववेत्ते यांचा परिचयविद्यार्थी आनंदाने त्यात सहभागी होत असल्याचा प्रत्यय

- राम शिनगारे

औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या परिसरात असलेल्या मुलानी वाडगाव गावातील जि.प. प्राथमिक शाळा प्रयोगशील शाळा म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. या शाळेत विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचा यशस्वी प्रयोग शिक्षकांनी राबविला आहे. या प्रयोगाला यश मिळाल्यामुळे गावकरीही शाळेला आवश्यक ती मदत करीत असल्याची माहिती शाळेतील शिक्षिका सारिका बद्दे यांनी दिली.

पैठण तालुक्यात मुलानी वाडगाव हे छोटेखानी पुनर्वसित गाव आहे. या गावात जिल्हा परिषदेची पाचवीपर्यंतची शाळा आदर्श म्हणून नावारूपाला आली आहे. शाळेचा परिसर हिरवाईने नटलेला आहे. संरक्षक भिंत असून, प्रांगणात पेव्हर ब्लॉक बसविले आहेत. विद्यार्थ्यांना पिण्यासाठी फिल्टरचे पाणी ग्रामपंचायतीने उपलब्ध केले आहे. या शाळेतील सर्वच शिक्षक २०१८ मध्ये रुजू झालेले आहेत. त्यांना शाळेतील मुलांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असल्याचे लक्षात आल्यानंतर ‘माझे सूर्योदयी उपक्रम’ नावाचा उपक्रम त्यांनी सुरू केला. यात विद्यार्थ्यांकडून परिपाठ घेतला जातो. यातून मुले बोलकी झाली. त्यांचा आत्मविश्वास दुणावला. श्रावण महिन्यात विविध उत्सावांचे देखावे तयार करण्यासाठी ‘श्रावण मासी, हर्ष मानसी’ हा उपक्रम राबविला. यात विद्यार्थ्यांनी देखावे तयार केले. महापुरुषांच्या जयंत्या, स्मृतिदिन विविध माध्यमांतून साजरे केले जातात.

जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात गावातील महिलांना सहभागी करून घेतले जाते. शाळेतील महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘माझे शिकण्याचे प्रयोग.’ या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्यात येते. त्याचवेळी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी भेटीसाठी नेण्यात येते. त्याठिकाणी विद्यार्थी मुलाखती घेतात. सादरीकरण करतात. या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असल्याचेही शिक्षक सारिका बद्दे सांगतात. या प्रकारच्या अध्ययनामुळे विद्यार्थी आनंदाने त्यात सहभागी होत असल्याचा प्रत्ययही येत आहे.

‘माझे प्रेरणादायी आदर्श’ याद्वारे वैज्ञानिक आणि थोर तत्त्ववेत्ते यांचा परिचय करून दिला जातो. त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित गोष्टी सांगितल्या जातात. यासाठी यू ट्यूब, गुगल, बोलो अ‍ॅप याचाही वापर केला जातो. याशिवाय शाळेत सहल, क्षेत्रभेटीसह वाचन प्रेरणा, आंतरराष्ट्रीय विज्ञान, मराठी राजभाषा, संविधान, बाल, स्वयंशासन, बालिका दिन मोठ्या उत्साहात आणि नावीन्यपूर्णरीत्या साजरे केले जातात. यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास केला जात आहे. या उपक्रमांचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल यांनी कौतुकही केले आहे. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक सुभाष जगदाळे, शिक्षक बाळासाहेब कोपले, राजाभाऊ चव्हाण, सारिका बद्दे, अनुराधा उसरे, शुभांगी गुठे, स्वाती पाटील हे परिश्रम घेत आहेत.

डिजिटल बनविण्याचा ध्यासशाळेमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षक नावीन्यपूर्ण अध्यापन करीत आहेत. मात्र, शाळेतील विद्यार्थ्यांना अधिक तंत्रस्नेही बनविण्यासाठी शाळा डिजिटल करण्याचा ध्यास सर्वच शिक्षकांनी घेतला आहे. त्यासाठी गावकरीही मदत करण्यास तयार आहेत. त्यामुळे येत्या वर्षभरात हा प्रकल्पही मार्गी लागेल, असा विश्वास शिक्षक व्यक्त करतात. शाळेला सिजेंटा फार्मा कंपनीने  संगणक प्रोजेक्ट्रर आणि प्रिंटर दिले आहे. इतरही कंपन्यांच्या सीएसआर फंडातून शाळेतील पायाभूत सुविधांचा विकास करण्याचा प्रयत्न शिक्षक करीत आहेत.

शाळेची माहितीगाव : मुलानी वाडगाववर्ग : पहिली ते पाचवीविद्यार्थी संख्या : १७०शिक्षक संख्या : एक मुख्याध्यापक, सहा शिक्षक

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण