शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पूरक आहारातील बिस्किटे खाल्ल्यानंतर झेडपी शाळेतील २०० च्यावर विद्यार्थ्यांना विषबाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 13:37 IST

बिस्कीट खात असताना अचानक विद्यार्थ्यांना मळमळ होण्यास सुरुवात झाली. पैठण तालुक्यातील केकत जळगाव झेडपी शाळेतील घटना

- अनिल कुमार मेहेत्रेपाचोड ( छत्रपती संभाजीनगर) :  पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील जिल्हा परिषद  शाळेतील तब्बल २०० च्या वर विद्यार्थ्यांना पूरक आहारात देण्यात आलेली बिस्किट खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शाळेत घडली. सर्व विद्यार्थ्यांवर पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

केकत जळगाव येथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेत २९६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शनिवारी अर्धवेळ शाळा असल्यामुळे सकाळी आठ वाजेच्या सुमारास  विद्यार्थी शाळेत आले  होते. साडेआठ वाजेच्या सुमारास परिपाठ झाल्यानंतर शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पूरक आहार म्हणून पारले कंपनीचे बिस्कीट पुडे वाटप केले. बिस्कीट खात असताना अचानक विद्यार्थ्यांना मळमळ होण्यास सुरुवात झाली. शाळेत हजर असलेल्या सर्चव विद्यार्थ्यांना मळमळ होण्यास सुरुवात झाली. माहिती मिळताच सरपंच, पालक, गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत धाव घेत विद्यार्थ्यांना मिळेल त्या वाहनाने उपचारासाठी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला  १०० च्या वर विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली दिसून येत होती. 

यावेळी पाचोड ग्रामीण रुग्णालयात पालकांची एकच गर्दी झालेली दिसून येत होती. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदिपान काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नोमांन शेख , डॉ. बाबासाहेब घुगे,  डॉ. राहुल दवणे, डॉ. अक्षय खरग, डॉ. वैष्णवी ठाकरे , डॉ. सोनाली गोंडगे यांनी विद्यार्थ्यांवर तत्काळ उपचार सुरू केले. विद्यार्थ्यांचा विषबाधाचा आकडा वाढत चालल्यामुळे वैद्यकीय अधीक्षक संदिपान काळे यांनी पाचोड येथील सर्वच खाजगी हॉस्पिटल मधील डॉक्टरांना ग्रामीण रुग्णालयात विद्यार्थ्यांना उपचार करण्यासाठी पाचारण केले.

घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात येऊन पाहणी केली. यावेळी पैठण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू भुमरे पाटील , सरपंच शिवराज भुमरे पाटील ,  उपसरपंच शिवाजी भालसिंगे पाटील ,  सोसायटीचे चेअरमन जिजा भुमरे पाटील , ग्रामपंचायत सदस्य अनिल भुमरे पाटील,  केकत जळगाव येथील सरपंच जायभाये  माजी सरपंच भीमराव थोरे, ज्ञानदेव बडे , शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे जिल्हा उपाध्यक्ष विलास शेळके  पाटील , युवराज चावरे पाटील आदींनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन मदत कार्यास सहकार्य केले. तसेच  पैठण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्रीराम केदार, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अनिल पुदत,  विहामांडवा केंद्राचे केंद्रप्रमुख मधुकर शेळके, पाचोड केंद्राचे केंद्रप्रमुख बळीराम भुमरे पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन पाहणी करत विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची  विचारपूस केली.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाAurangabadऔरंगाबादfood poisoningअन्नातून विषबाधा