शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

औट्रम घाट जड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद;शेतकरी,पेट्रोलपंप,हॉटेल,गॅरेजच्या व्यवसायावर गदा!

By विकास राऊत | Updated: September 14, 2023 13:16 IST

कन्नडमार्गे चाळीसगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील औट्रम ११ कि.मी.च्या घाटात वाहतूक खोळंबत असल्याने तो बंद केला आहे.

छत्रपती संभाजीनगर : नॅशनल हायवे क्र. २११ (५२) सोलापूर ते धुळे या महामार्गावर असलेल्या कन्नड व चाळीसगावच्या मधील औट्रम घाटातील बोगद्याचे काम रद्द करण्याचा निर्णय होऊन वर्ष झाले आहे. महिनाभरापासून तो घाटही जड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद आहे. यामुळे मार्गावरील पेट्रोल पंप, हॉटेल, गॅरेजच्या व्यवसायावर गदा आली आहे. घाट बंद आणि अर्थकारण ठप्प, अशी परिस्थिती आहे.

कन्नडमार्गे चाळीसगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील औट्रम ११ कि.मी.च्या घाटात वाहतूक खोळंबत असल्याने तो बंद केला आहे. मागील काही वर्षांपासून त्या घाटाला पर्यायी मार्ग नाही. रोज १२ हजारांहून अधिक वाहनांच्या राबत्यावर पेट्रोल पंप, हॉटेल, गॅरेजच्या व्यवसायाची रोजी-रोटी अवलंबून होती. घाट जड वाहतुकीला बंद असल्यामुळे हे अर्थकारण बंद पडले. आता ही वाहतूक धुळे ते मनमाड, अहमदनगर, पुणे ते सोलापूर व दक्षिण भारताकडे जात असल्याने घाटामागील व पुढील महामार्गावरील व्यावसायिक हताश आहेत.

शेतकऱ्यांचेही नुकसान....घाटाच्या पलीकडून येणारा भाजीपाला शेतकरी कन्नड व छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने आणतात. परंतु ती वाहने देखील इतर मार्गाने जात आहेत. परिणामी, शेतकऱ्यांचे अर्थकारणही कोलमडले आहे. तर वाहतूक लांबून होत असल्यामुळे भाजीपाला महागला आहे.

घाट एक, संकटे अनेक....साडेपाच ते ६ हजार कोटींवर औट्रम बोगद्याच्या कामाचा खर्च गेल्यामुळे खर्चात कपात करण्याचा ‘घाट’ एनएचएआयने घातला. नवीन पर्याय शोधण्याच्या डीपीआरलाही एजन्सीअभावी ग्रहण लागले. पर्याय शोधण्यासाठी तीन वेळा डीपीआरसाठी निविदा मागविल्या. परंतु कुठलीही एजन्सी पुढे न आल्यामुळे औट्रम घाटामागे लागलेले संकट कायम आहे.

आम्ही गुंतवणूक करून चूक केली का...?सोलापूर-धुळे हायवे बांधण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या सेवेसाठी असलेले हॉटेल्स, गॅरेज, पेट्रोलपंप चालकांचे सध्या हाल सुरू आहेत. घाट बंद असून जड वाहनांसह इतर वाहनेदेखील औरंगाबाद जिल्ह्याच्या हद्दीतून येत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहेच; शिवाय ६ हजारांवरून २ हजार लिटर इंधन विक्री झाली आहे. गॅरेज, हॉटेल्स चालकांचे तर प्रचंड नुकसान होत आहे. महामार्गावर गुंतवणूक करून चूक केल्यासारखे वाटते आहे.-विश्वदीप करंजीकर, पेट्रोल पंपचालक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्ग