शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! शेतात नेऊन महिलेवर तिघांचा अत्याचार; व्हिडीओ केला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 18:08 IST

गंगापूर तालुक्यातील घटनेत पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात

गंगापूर ( औरंगाबाद ) : गंगापूर तालुक्यात धक्कादायक घटना घडली असून तीन जणांनी एका विवाहित महिलेवर शेतात नेऊन दोनदा बलात्कार केला आहे. याबाबत पिडीत ३२ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून गंगापूर पोलिसांनी तिघांविरोधात बलात्कार व अनुसूचित जातीजमाती प्रतिबंधक कायद्या नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडिता मागील महिन्यात १० नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेली होती. यावेळी भगवान अशोक सुकाशे याने अत्याचार करून मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर १ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता शौचास जात असताना भगवान सूकाशे, रामेश्वर अशोक सुकाशे, अमरनाथ सुनील सुकाशे या तिघांनी दुचाकीवरून पाठलाग केला. बाजूच्या कापसाच्या शेतात बळजबरी नेऊन भगवान सुकाशे याने इतर दोघांच्या मदतीने पुन्हा पिडीतेवर अत्याचार केला. तसेच वाच्यता केल्यास पतीला आणि तुला जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद पीडितेने आज (दि.८) सकाळी गंगापूर पोलिसात ठाण्यात दिली. 

दरम्यान, पोलिसांनी आरोपी भगवान अशोक सूकाशे ( ३२) रामेश्वर अशोक सुकाशे (२९) आणि अमरनाथ सुनील सुकाशे (१९, सर्व रा. संजरपुर ता.गंगापूर जि.औरंगाबाद ) यांच्या विरोधात बलात्कार,जीवे मारण्याची धमकी,अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेल्हे हे करीत आहेत. 

अत्याचाराचा व्हिडीओ केला व्हायरल अत्याचाराची वाच्यता केल्यास तुला व तुझ्या पतीला जीवे मारण्याची धमकी आरोपीने पीडितेला दोन्ही वेळा दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने झालेल्या अत्याचाराबद्दल कोणालाही सांगितले नाही. मात्र, आरोपीने अत्याचाराचा व्हिडिओ बनवला होता. काही दिवसांनी आरोपींनी व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केला. हे पीडितेच्या पतीला समजले. त्यानंतर महिलेने माहेरी याबद्दल सांगितले. माहेरच्या मंडळींनी धीर दिल्यानंतर पीडितेने भावाच्या मदतीने पोलिसात तक्रार दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद