शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 23:46 IST

जालना रोडवरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

छत्रपती संभाजीनगरमहावितरणच्या हलगर्जीपणामुळे दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज सायंकाळी चिकलठाणा परिसरात घडली. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी चिकलठाणा हनुमान चौकात जालना रोडवर जोरदार रास्ता रोको आंदोलन छेडले असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

मृतांमध्ये कचरू जनार्दन दहीहंडे (वय ५०) आणि बाळू उर्फ बालाजी जनार्दन दहीहंडे (वय ३०) या काका पुतण्यांचा समावेश आहे. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शेतात मशागत सुरू असताना विद्युत तारेचा शॉक बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पंधरा दिवसांपूर्वी आलेल्या वादळात या भागातील वीज वाहिनी तुटली होती. स्थानिकांनी याची वेळोवेळी माहिती महावितरणला दिली होती. मात्र, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर आज ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.

घटनेनंतर तातडीने मोठ्या प्रमाणात मृतांचे नातेवाईक, शेतकरी आणि नागरिक हनुमान चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू केले. केंब्रिज चौक ते विमानतळ या दोन्ही दिशांना वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. घटनास्थळी मोठा जमाव जमलेला असून दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे.

संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह रस्त्यावर ठेवत "जिल्हाधिकारी घटनास्थळी येईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही," असा पवित्रा घेतला आहे. जिल्हाधिकारी यांनी दुर्लक्ष करणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाकडून लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर रात्री साडे अकरा वाजता रास्तारोको मागे घेण्यात आला.

दरम्यान, जालना रोडवरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरmahavitaranमहावितरण