शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोराेनाचा प्रादुर्भाव : शहरातील तब्बल १९ वार्ड बनले डेंजर झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 19:41 IST

Outbreak of Corana in Aurangabad : फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्यास पुन्हा सुरुवात झाली.

ठळक मुद्दे ५० वार्डांत परिस्थिती नियंत्रणात

औरंगाबाद : शहरातील प्रत्येक वसाहतीमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नेमके करावे तरी काय, असा प्रश्न आरोग्य यंत्रणेला पडला आहे. १९ वार्डमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याचे महापालिकेला निदर्शनास आले. सर्वाधिक रुग्ण आढळून येणाऱ्या वार्डला रेड झोनमध्ये टाकण्यात आले आहे. ५० वार्डमध्ये रुग्ण अत्यंत कमी प्रमाणात आहेत. या भागातील परिस्थिती अद्याप नियंत्रणात आहे. रेड झोनमधील सर्व वॉर्डांमध्ये पालिका कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवणार आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्यास पुन्हा सुरुवात झाली. गेल्या आठ–दहा दिवसांत दररोज ३५० ते ३७० रुग्ण आढळून येत आहेत. एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य कोरोनाबाधित होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. सुमारे तीनशे कुटुंबातील दोन किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य कोरोनाबाधित झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडे आहे. रुग्ण संख्या वाढू लागल्यामुळे कोविड केअर सेंटर्स आणि खासगी दवाखानेदेखील हाऊसफुल्ल झाले आहेत. रात्रीची संचारबंदी, मंगल कार्यालये, कोचिंग क्लासेस बंद करण्यात आले आहेत; मात्र त्याचा किंचितही फरक पडलेला नाही.

महापालिकेने वाढत्या रुग्णसंख्येसोबत वेगवेगळी माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. या माहितीनुसार शहरातील तब्बल १९ वॉर्ड सध्या कोरोनाच्या दृष्टीने रेडझोन झाले आहेत, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. नेमके या भागात रुग्ण का वाढत आहेत, याचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. त्यावर लगेच काय उपाययोजना करता येईल ,हे सुद्धा सुरू आहे.

हे आहेत डेंजर झोनमधील वार्डसातारा - देवळाई, पडेगाव - मिटमिटा, खडकेश्वर, नागेश्वरवाडी, शिवनेरी कॉलनी सिडको एन ९, पवननगर, आयोध्यानगर, सिडको एन १,एन ५, हुसेन कॉलनी, विश्रांतीनगर, कामगार चौक, उल्कानगरी, सुराणानगर, गादिया विहार, शिवाजीनगर, गुरुदत्तनगर, कांचनवाडी, देवानगरी या वॉर्डांचा त्यात समावेश आहे.

सर्वाधिक कोरोना चाचणी याच भागातडेंजर झोनमध्ये असलेल्या वॉर्डांमध्ये आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर (कोरोनाबाधिताच्या संपर्कातील व्यक्ती) भर दिला जाणार आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात असलेल्या जास्तीत जास्त व्यक्ती शोधून काढून त्यांची कोरोना चाचणी करणे, त्यांचे विलगीकरण करणे यावर भर दिला जाणार आहे. ज्या व्यक्तींना होम आयसोलेशनची सुविधा दिली आहे, त्या व्यक्ती घरातच राहतात, याची खात्री सतत केली जाणार आहे. होम आयसोलेशनमधील व्यक्तींनी घराच्या बाहेर पडू नये, याकडे लक्ष दिले जाणार आहे, असे डॉ. पाडळकर म्हणाल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका