शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांची १७० कोटी थकबाकी देणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 15:52 IST

यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना सुरू होणे शक्य

औरंगाबाद : राज्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांच्या वीजबिलाची १७० कोटी रुपये थकबाकी देण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना सुरू होणे शक्य होणार आहे, असे मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर निंबाळकर यांनी बुधवारी सांगितले. 

जूनपर्यंत वीजबिल भरण्यात येणार आहे. वीजबिल थकल्यामुळे महावितरण कंपनीने ग्रामीण पुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे पाणी असूनही विजेअभावी ग्रामपंचायतींना उपसा करणे शक्य नव्हते. थकबाकी देण्याचा निर्णय झाल्यामुळे ग्रामीण भागांना दिलासा मिळणार आहे. विभागातील दुष्काळ, जलसाठा, चाराटंचाईच्या अनुषंगाने निंबाळकर यांनी आढावा बैठक घेतली. मराठवाड्यात चाराटंचाई जाणवणार नाही, असे सांगून निंबाळकर म्हणाले, जायकवाडी सध्या मृत साठ्यात आलेले आहे. विभागात ४ टक्के जलसाठा आहे. 

३०० ते ३ हजारांपर्यंत जनावरे चारा छावणीत राहतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या काही योजनांचा विचार केला जात आहे. चारा आहे; परंतु त्याची वाहतूक करावी लागणार आहे. त्या दृष्टीने नियोजन केले आहे. तात्पुरती पाणीपुरवठा योजना राबविण्याचा निर्णय झाला आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे लाईटबिल थकले होते. त्यासाठी १७० कोटी रुपये शासनाने देऊ केले आहेत. दुष्काळ अनुदान वाटपाच्या अनुषंगाने निर्णय झाला आहे. सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. 

मराठवाड्यात रबीत पेरणी कमी मराठवाड्यात एक, दोन जिल्हे वगळता रबी हंगामात पेरणी झालेली नाही. भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, पुणे व साताऱ्यात रबी हंगामाची माहिती जाहीर करण्यात येणार आहे. खरिपामध्ये जे तालुके दोन्ही ट्रिगरमध्ये होते. त्यानुसार विभागातील ४१ तालुक्यांचा विचार झाला. खरीप हंगाम हातातून गेलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप केले आहे. वाड्या, वस्त्यांवर  पाणीपुरवठा करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे.अनुदान वाटपाची सॉफ्टवेअरवरून माहिती मिळते, असे निंबाळकर यांनी  सांगितले. 

टॅग्स :fundsनिधीState Governmentराज्य सरकारelectricityवीजgram panchayatग्राम पंचायत