शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नैराश्यातून पतीचे भयंकर कृत्य; हातोडीचे वार करत पत्नीच्या डोक्याचा केला भुगा

By सुमित डोळे | Updated: February 7, 2024 17:47 IST

खून केल्यानंतर पतीने नातेवाईकांना कॉलकरून दिली कृत्याची माहिती

छत्रपती संभाजीनगर : कंपनी बंद पडल्यानंतर सुरू झालेल्या आर्थिक अडचणी, कौटूंबिक ताण तणावातून नैराश्यात गेलेल्या पतीने पत्नीची झोपेतच हत्या केली. पत्नी गार झोपेत असताना घरातील छोट्या हाताड्याने त्याने पत्नीच्या डोक्याचा अक्षरक्ष: भुगा केला. लिला कृष्णा नाफडे (५१) असे मृत महिलेचे नाव असून कृष्णा निवृत्ती नाफडे (५३) असे क्रुर पतीचे नाव आहे. हत्या केल्यानंतर बुधवारी पहाटे ४.२६ वाजता त्याने मुलासह नातेवाईकांना कॉल करुन स्वत:च्या कृत्याची माहिती दिली.

कृष्णा व्हिडिओकॉन कंपनीत कामाला होता. काही वर्षांपुर्वी कंपनी बंद पडली. पत्नीसह तो म्हाडा कॉलनीतील तोरणागड परिसरात राहत होता. त्याचा लहान मुलगा नाशिकला वैद्यकिय शिक्षण घेतो तर विवाहित मुलगी ठाण्याला पतीसह वास्तव्यास असते. कंपनी बंद पडल्यानंतर कृष्णाच्या वागण्यात बदल होत गेला. मुळ बुलढाणा जिल्ह्यातील असलेला कृष्णाला शेतातून देखील उत्पन्न नव्हते. त्यामुळे तो दिवसेंदिवस अधिक नैराश्यात गेला. तो सातत्याने आत्महत्याच्या गप्पा मारत होता. मंगळवारी त्याने पत्नीसोबत रात्री जेवण केले. मुलांसोबत कॉलवर बोलणे देखील झाले. 

दरम्यान, आज पहाटे गाढ झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात सेंट्रिंगचे काम करणाऱ्या हातोडीने कृष्णाने वार केले. कपाळाच्या मधोमध छिद्रपाडून उजव्या बाजुने डोके ठेचून काढले. त्यानंतर त्याने नातेवाईकांना कॉल करून कृत्याची माहिती दिली. घटनेची माहिती कळताच मुकूंदवाडी ठाण्याचे निरीक्षक शिवाजी तावरे यांनी सहकाऱ्यांसह धाव घेतली.

कृष्णा घरातच बसलेला होता. लिला यांचा मृतदेह घाटी रुग्णालयात रवाना करुन पोलिसांनी कृष्णाला ताब्यात घेतले. पोलिसांना देखील तो विचित्र उत्तरे देत बडबड करत होता. मुलाच्या तक्रारीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करुन वडिल कृष्णाला अटक करण्यात आली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी