शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मनपाला अभय योजनेतून अपेक्षा होती १०० कोटींची, मात्र मिळाले केवळ १८ कोटीच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 12:53 IST

मालमत्ताकरावर लावण्यात आलेले व्याज, दंड माफ करून मूळ रक्कम भरून घेण्याची योजना मनपाने दीड महिन्यांपूर्वी सुरू केली.

ठळक मुद्देशहरातील मालमत्ताधारकांकडे सुमारे २३० कोटी रुपयांची थकबाकी आहे. अभय योजनेत थकबाकी भरणाऱ्यांना व्याज व दंडाच्या रकमेमध्ये ७५ टक्के सूट देण्यात येते

औरंगाबाद : मालमत्ताकरावर लावण्यात आलेले व्याज, दंड माफ करून मूळ रक्कम भरून घेण्याची योजना मनपाने दीड महिन्यांपूर्वी सुरू केली. २३० कोटी रुपयांची थकबाकी नागरिकांकडे असल्याने किमान १०० कोटी रुपये तरी जमा होतील अशी अपेक्षा होती. पन्नास दिवसांमध्ये फक्त १८ कोटी ५० लाख रुपये प्राप्त झाले. या रकमेतही नियमित कर भरणाऱ्यांचा समावेश आहे. मनपाच्या अभय योजनेला मालमत्ताधारकांकडून अजिबात प्रतिसाद न मिळाल्याने ३१ मेनंतर मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.

शहरातील मालमत्ताधारकांकडे सुमारे २३० कोटी रुपयांची थकबाकी आहे. वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही रक्कम वसूल होत नसल्याने प्रशासनाने अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला. पुणे महापालिकेने शासनाची परवानगी मिळवून ही योजना राबविली होती. औरंगाबाद महापालिकेनेही शासन निर्णयाच्या अधीन राहून ही योजना राबविली. थकबाकी भरणाऱ्यांना व्याज व दंडाच्या रकमेमध्ये ७५ टक्के सूट देण्यात येत आहे. १ एप्रिलपासून ३१ मे पर्यंत दोन महिन्यांसाठी ही योजना आहे. अभय योजना जाहीर होऊन दीड महिना उलटला असला तरी मालमत्ताधारक कर भरण्यास समोर येत नसल्याचे चित्र आहे.

आतापर्यंत केवळ १८ कोटी ५० लाख रुपयांची वसुली झाली असल्याचे महापौरांनी सांगितले. महापालिकेला या योजनेतून किमान १०० कोटी रुपयांची अपेक्षा होती; मात्र अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने यापुढे अभय योजनेला मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. महापालिकेच्या तिजोरीत गेल्या दीड महिन्यांत १८ कोटी ५० लाख रुपये जमा झाले असले तरी अभय योजनेचा लाभ किती जणांनी घेतला, याची आकडेवारी उपलब्ध नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामध्ये नियमित वसुलीचाही समावेश आहे. 

१४० कर्मचारी वसुलीसाठीनोव्हेंबर २०१७ मध्ये मालमत्ता कराच्या वसुलीसाठी आऊटसोर्सिंगमार्फत मनपाने १४० कर्मचारी नेमले आहेत. प्रत्येक झोनला किमान १२ ते १५ कर्मचारी नियुक्त केले आहेत.एवढ्या मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ नेमल्यानंतरही मार्चअखेरपर्यंत वसुली मागील वर्षीच्या तुलनेत कमीच होती. १ एप्रिलपासून या कर्मचाऱ्यांना पुन्हा वसुलीसाठी म्हणून नेमण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारावर जेवढी रक्कम खर्च होत आहे, त्या तुलनेत वसुलीत किंचितही वाढ झालेली नाही. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकरMONEYपैसा