शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

'आपला भगवा, आपली शिवसेना'; बंडखोरीनंतर शिवसेनेची पुन्हा मोर्चेबांधणीला सुरुवात

By बापू सोळुंके | Updated: August 4, 2022 18:35 IST

७ ते २० ऑगस्टदरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात मोहीम

औरंगाबाद : महिनाभरापूर्वी जिल्ह्यातील पाच आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासोबत पक्षाचे काही पदाधिकारीही गेले होते. या बंडखोरीचा फटका आगामी जि. प., पं. समित्या आणि महापालिकेच्या निवडणुकीत बसू नये, यासाठी शिवसेनेने पुन्हा एकदा पक्षबांधणीकडे लक्ष दिले आहे. जिल्ह्यात ७ ते २० ऑगस्टदरम्यान आपला भगवा, आपली शिवसेना मोहिमेचे आयोजन केले आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत या माेहिमेची माहिती दिली. दानवे म्हणाले की, शिवसेनेचे जिल्ह्यातील पाच आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यानंतर तीन नगरसेवक, एक तालुकाप्रमुख, तीन उपशहर, एक, दोन विभागप्रमुख शिंदे गटाला जाऊन मिळाले. असे असले तरी सामान्य शिवसैनिक आणि उर्वरित ९९ टक्के पदाधिकारी आजही पक्षासोबत आहेत शिवाय नवीन पदाधिकाऱ्यांच्या तत्काळ नेमणुका करण्यात आल्या. लवकरच जि. प., पं. स. आणि महापालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये पक्षाच्या निष्ठावंतांचाच विचार केला जाणार आहे. यासाठी ७ ते २० ऑगस्टदरम्यान आपण पदाधिकाऱ्यांसह मोहीम राबवत आहोत. मोहिमेत शिवसेेनेचे आजी, माजी पदाधिकारी, महिला आघाडी आणि लोकप्रतिनिधी सहभागी होतील, असे आ.दानवे म्हणाले. पत्रकार परिषदेला कृष्णा डोणगावकर, आनंद तांदूळवाडीकर, गोपाल कुलकर्णी, प्रतिभा जगताप आदींची उपस्थिती होती.

अशी असेल मोहीम७ ते २० ऑगस्टदरम्यान जिल्ह्यात आपला भगवा, आपली शिवसेना ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यात ७, ८ ऑगस्टला कन्नड, सोयगाव, ९ आणि १२ ऑगस्टला वैजापूर, १५ ऑगस्टला खुलताबाद, १६ रोजी औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघ, १७ रोजी पूर्व मतदारसंघ, १९ ऑगस्टला पश्चिम मतदार संघातील ग्रामीण भागात तर २० रोजी पश्चिम मतदारसंघातील शहरी भागांत ही मोहीम राबविली जाईल.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरेAmbadas Danweyअंबादास दानवे