शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

आपली नदी खाम नदी स्वच्छता अभियान; खामनदीत २४९ ठिकाणी सोडले जाते सांडपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 15:45 IST

घाण, कचऱ्यामुळे अत्यंत अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त आणि प्रदूषित झालेले नदीचे पात्र 'आपली नदी खाम नदी स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छ करून नदीला गतकालीन महत्त्व प्राप्त करून देण्याचे महत्त्वाकांक्षी अभियान औरंगाबाद महापालिका, छावणी परिषद , काही सामाजिक आणि अशासकीय संस्था आणि सुजाण नागरिकांच्या सहकार्याने सुरु आहे.

ठळक मुद्देसातारा पर्वतरांगा आणि जटवाडा टेकड्यांच्यामध्ये दुधना नदीच्या खोऱ्यात खाम नदीचा उगम होतो.

- प्रभुदास पाटोळेऔरंगाबाद : नैसर्गिकरित्या स्वच्छ आणि पिण्यालायक पाणी असल्यामुळे सुमारे चार शतकापूर्वी ज्या नदीच्या तीरावर तत्कालीन 'खडकी' गाव आणि आजचे 'औरंगाबाद' शहर वसले , त्या खाम नदीच्या पात्रातून सध्या पाण्याऐवजी सांडपाणीच वाहते आहे. तब्बल २४९ ठिकाणी या नदीपात्रात मलयुक्त पाणी सोडले जात असल्याचे एका पाहणीतून समोर आले.

घाण, कचऱ्यामुळे अत्यंत अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त आणि प्रदूषित झालेले नदीचे पात्र 'आपली नदी खाम नदी स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छ करून नदीला गतकालीन महत्त्व प्राप्त करून देण्याचे महत्त्वाकांक्षी अभियान औरंगाबाद महापालिका, छावणी परिषद , काही सामाजिक आणि अशासकीय संस्था आणि सुजाण नागरिकांच्या सहकार्याने सुरु आहे. २५ जानेवारीपासून सुरु केलेल्या या अभियानांतर्गत ७ फेब्रुवारी आणि ६ मार्च २०२१ ला दर शनिवारी सकाळी ७:३० ते १०:३० दरम्यान पहिल्या टप्प्यात आयकर कार्यालयालगत लोखंडी पुलाजवळील नदी पात्रात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. भिंत चित्रीकरण आणि बारापुल्ला पुलाखाली पाणी अनुकूल अर्जुन, अश्वगंधा , शिरीष , कांचन , करंज , खैर , अडुळसा आदी ३४ भारतीय जातीच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. येथे गुलमोहरसारख्या वृक्षांचे रोपण केल्यास परिसरातील निसर्ग सौंदर्यात भर पडेल, असे निसर्ग प्रेमींचे म्हणणे आहे. मात्र, सध्या कोविडच्या उद्रेकामुळे शहरात जमावबंदी लागू असल्याने हे अभियान तूर्तास स्थगित झाले आहे. परिस्थिती निवळताच पुन्हा अभियान सुरु होणार आहे .

दुधना नदीच्या खोऱ्यात नदीचा उगमसातारा पर्वतरांगा आणि जटवाडा टेकड्यांच्यामध्ये दुधना नदीच्या खोऱ्यात खाम नदीचा उगम होतो. सध्याच्या औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती भागातून गंगापूर तालुक्यातील येसगाव येथपर्यंत ७२ किमीच्या पट्ट्यातून वाहत जाऊन खाम नदी गोदावरी नदीत नाथसागरात जाऊन मिळते. या ७२ किमीच्या दरम्यान औरंगाबादेतील विविध वसाहती, आस्थापना आणि औद्योगिक वसाहती मधून २४९ ठिकाणी सांडपाणी, रसायनयुक्त पाणी, घनकचरा, मलमूत्र आणि इतर घाण नदी पात्रात सोडली जाते, असे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात आढळले आहे.

टॅग्स :riverनदीAurangabadऔरंगाबाद