शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अन्यथा नवीन जलवाहिनीची योजना समांतरच्या वाटेने; भाजपाला भीती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 17:16 IST

BJP fears, Aurangabad Water Pipeline Scheme योजनेत ३० टक्के म्हणजेच ६३१ कोटी रुपयांचा वाटा महापालिकेने उचलण्याचे हमीपत्र मनपा प्रशासकांनी शासनाला दिले आहे.

ठळक मुद्दे सरकारने ६३१ कोटींचा वाटा उचलण्याची मागणीहे सगळे मनपा निवडणुकीला समोर ठेवून होत आहे

औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात शहर पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. त्या योजनेत ३० टक्के म्हणजेच ६३१ कोटी रुपयांचा वाटा महापालिकेने उचलण्याचे हमीपत्र मनपा प्रशासकांनी शासनाला दिले आहे. पालिका ही रक्कम कुठून उभारणार. ही रक्कम जर मनपाने दिली नाहीतर ही योजनाही बासनात गेलेल्या समांतर जलवाहिनी योजनेच्या दिशेने जाईल, अशी भीती भाजपाचे आ. अतुल सावे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. 

आ. सावे म्हणाले, डिसेंबर २०१९ मध्ये योजनेची निविदा निघाली होती. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात सुमारे ५५ बैठका झाल्यानंतर १६८० कोटी रुपयांची संचिका चार खात्यांच्या टेबलवरून मंजूर करून आणली. तेव्हा आता कुठे डिसेंबर २०२० मध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे योजनेचे भूमिपूजन करीत आहेत. या कामासाठी आमचा विरोध नाही. कारण, ही योजनाच भाजपाने आणलेली आहे. समांतर योजना बंद पडली. त्यावेळीही मनपाचा वाटा म्हणून, कोट्यवधी रुपये खर्च झाले. आतादेखील तसेच होणार असेल तर औरंगाबादकरांची फसवणूक केल्यासारखे होईल. समांतर जलवाहिनीसाठी केंद्र शासनाने दिलेले अनुदान बँकेत आहे, ते अनुदान शासनाने या योजनेसाठी मागावे. यावेळी खा. डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष संजय केनेकर, विजया रहाटकर, शिरीष बोराळकर, प्रमोद राठोड, प्रशांत देसरडा, अनिल मकरिये, शिवाजी दांडगे यांची उपस्थिती होती.

हे सगळे मनपा निवडणुकीला समोर ठेवून होत आहेयोजनेसाठी १ टक्का रक्कम म्हणजेच १७ कोटी रुपये मनपा गेल्यावर्षी भरू शकत नव्हती. त्यावेळी सवलतीची मागणी माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी केली होती. त्यानंतर १७ कोटींची रक्कम प्रकल्प किमतीत टाकली होती. मनपाची आर्थिक परिस्थिती सक्षम नसताना ६३१ कोटी रुपये मनपा कोठून देणार, असा प्रश्न आहे. जी पालिका एक टक्का रक्कम भरू शकत नाही, ती ३० टक्के कोठून भरणार. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जर हा भूमिपूजनाचा ट्रेलर असेल तर योजनेचा चित्रपट पूर्ण होण्याबाबत साशंकता आहे, असे आरोप शहर जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी केला.

टॅग्स :Parallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBJPभाजपा